-
९६ वर्षीय धरमपाल गुलाटी यांचा चेहरा सर्वांच्याच ओळखीचा असेल. आम्ही तुम्हाला सांगतोय ते एमडीएच या कंपनीचे मालक धरमपाल गुलाटी यांच्याबाबत. आयआयएफएल हुरून इंडिया रिच २०२० च्या यादीत सामील असलेले ते सर्वात वयस्कर भारतीय श्रीमंत व्यक्ती आहेत.
-
एकेकाळी त्यांच्याकडे १ हजार ५०० रूपये होते. परंतु आज ते तब्बल ५ हजार ४०० कोटी रूपयांचे मालक आहेत. त्यांना वार्षिक २५ कोटी रूपयांचं वेतन मिळतं. गुलाटी यांचं वेतन अन्य कोणत्या एफएमजीसी कंपनीच्या सीईओंच्या तुलनेत अधिक आहे.
-
गुलाटी यांना यापूर्वी पद्मभूषण या पुरस्कारनंही सन्मानित करण्यात आलं आहे. परंतु त्यांचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. महाशियन दी हट्टी (एमडीएच) कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी हे विभाजनानंतर आपल्या कुटुंबीयांसह भारतात आले.
-
दिल्लीत आल्यानंतर त्यांना टांगा चालवणं सुरू केले. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी १५०० रूपयापैकी ६५० रूपयांमध्ये एक टांगा आणि घोडा खरेदी केला. तसंच स्टेशन परिसरात ते टांगा चालवू लागले. परंतु काही दिवसांनी त्यांनी आपल्या भावाला टांगा देऊन करोलबाग परिसरातील अजमल खां रोडवर मसाले विकण्यास सुरूवात केली.
-
जसजसं त्यांच्या मसाल्याबद्दल समजत गेलं तसा त्यांचा व्यवसाय वाढत गेला. गुलाटी यांनी आपली सर्वात पहिली कंपनी १९५९ मध्ये दिल्लीतील किर्तीनगर परिसरात सुरू केली. त्यानंतर अजमल खां रोडवर त्यांनी दुसरी कंपनी सुरू केली. ६० च्या दशकात एमडीएचचं करोल बाग परिसरातील दुकानानं प्रसिद्धी मिळवली होती.
-
कालांतरानं त्यांचा व्यवसाय वाढत गेला. आज १०० पेक्षा अधिक देशांमध्ये त्यांचे मसाले पोहोचले आहेत. ५ हजार ४०० कोटी रूपयांच्या संपत्तीसह आयआयएफएलच्या यादीत ते २१६ व्या स्थानावर आहेत. तसंच यूरॉमॉनिटरनुसार ते एफएमजीसी क्षेत्रात सर्वाधित वेतन घेणारे सीईओ आहेत. गुलाटी यांचं वेतन २५ कोटी रूपये आहे.
-
वयोमानानुसार ते आजही सर्वात जास्त सक्रिय आहेत. आजही गुलाटी हे आपल्या कंपनी, डिलर आणि बाजारात जात असतात.
-
एमडीएचहा मसाल्यांच्या सर्वात मोठ्या ब्रॅन्डपैकी एक आहे. तसंच त्यांच्या कंपनीत ५० निरनिराळ्या मसाल्यांचं उत्पादन केलं जातं. एमडीएचचं आज केवळ भारतातच नाही तर दुबई आणि लंडनमध्येही कार्यालयं आहेत.
-
एमडीएच आज सामाजिक कार्यांमध्ये पुढे आहे. कंपनीद्वारे महाशय चुन्नीलास ट्रस्टचं संचालन केलं जात असून २५० बेड्सचं एक रुग्णालयदेखील चालवलं जातं.
-
याव्यतिरिक्त त्यांचं एक मोबाईल रुग्णालयदेखील आहे. झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबाना याद्वारे आरोग्यसेवा दिली जाते. याव्यतिरिक्त त्यांच्या ट्रस्टच्या चार शाळाही आहेत. तसंच गरजू लोकांनाही मदत केली जाते.
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य