-
मनात जिद्द असेल तर कितीही मोठं संकट आलं तरी आपण त्यावर मात करु शकतो. मोहितचा संघर्षमय प्रवास पाहून तुम्हालाही याची जाणीव होईल. एका पायाने अपंग असणाऱ्या मोहितबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
-
मनात जिद्द असेल तर कितीही मोठं संकट आलं तरी आपण त्यावर मात करु शकतो. मोहितचा संघर्षमय प्रवास पाहून तुम्हालाही याची जाणीव होईल. एका पायाने अपंग असणाऱ्या मोहितबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
-
मोहित मूळचा हरियाणामधील सोनीपतचा रहिवासी आहे.
-
मोहित ११ वर्षांचा असताना त्याला हाडांचा कॅन्सर असल्याचं निष्पन्न झालं होतं.
-
कॅन्सरमुळे मोहितचा पाय कापावा लागला होता.
-
मोहितला लहानपणापासूनच बॉडीबिल्डिंगची प्रचंड आवड होती. पाय कापावा लागल्यानंतर त्याने ही आपली आवड जोपासण्याचं ठरवलं.
-
मोहितने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ऑनलाइन व्हिडीओमध्ये त्याने अनेक दिव्यांगाना बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सहभागी होताना पाहिलं. जर हे लोक करु शकतात तर आपण का नाही असा विचार त्याच्या मनात आला. यानंतर त्याने बॉडी बिल्डिंग करण्यास सुरुवात केली.
-
मोहितच्या निर्णयामुळे त्यांचं कुटुंब चितेंत होतं. पण त्याने आपल्या निर्णयावर ठाम राहायचं ठरवलं.
-
२०१० मध्ये मोहितला कृत्रिम पाय लावण्यात आला.
-
पण २०१५ मध्ये एका दुर्घटनेमुळे त्याला कृत्रिम पाय गमवावा लागला होता.
-
पण यानंतरही मोहितने पराभव पत्करला नाही.
-
मोहितने एका पायावर चालण्याचा सराव सुरु केला. आज मोहित एका पायावरच सर्व कामं करु शकतो.
-
मोहित फक्त बॉडीबिल्डिंगची आवड जोपासत नसून अनेक स्पर्धांमध्येही सहभागी होत आहे.
-
मोहितने राष्ट्रीय चॅम्पिअनशिपमध्ये तीन गोल्ड. दोन सिल्व्हर आणि दोन ब्रॉन्झ पदकं जिंकली आहेत.
-
मोहित सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असतो. त्याने अनेक फॉलोअर्स आहेत.
-
परिस्थितीपुढे हतबल होणाऱ्या अनेकांसाठी मोहितचा हा प्रवास प्रेरणादायक आहे.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य