-
‘द सन’ या वृत्तपत्र बातमीनुसार लंडन रुग्णालयास ऑक्सफर्ड – अॅस्ट्राझेन्का लशीचा पहिला टप्पा स्वीकारण्यास सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. आरोग्यमंत्री हॅनकॉक यांनीही याच वर्षी लस मिळण्याची शक्यता नाकारलेली नाही. (छायाचित्र संग्रहित असून, प्रातिनिधीक स्वरूपात घेतेलेले आहेत/photo : Reuters)
-
जॉन्सन अॅण्ड जॉन्सननं चाचण्या थांबवल्यानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावाही लांबणीवर जाऊ शकतो. ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकांसाठी मतदान होण्यापूर्वी लोकांना लस देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. (फाइल फोटो/फोटो सौजन्य: रॉयटर्स)
-
करोना विषाणूमुळे जगभरात होत असलेले मृत्यू रोखण्यासाठी शास्त्रज्ञ रात्रंदिवस झटत आहेत. मात्र, या लशींना चाचण्यांमध्ये अडथळे येत लवकर लस येण्याच्या सगळ्यांच्या आशा मावळताना दिसत आहेत. यापूर्वी ब्रिटनच्या अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड तयार करत असलेल्या लशीचेही काही वाईट परिणाम दिसून आले होते. ज्यामुळे अमेरिका व ब्रिटननं हजारो चाचण्या रोखल्या होत्या.
-
जॉन्सन अॅण्ड जॉन्सननं सोमवारी मध्यरात्री एक निवेदन प्रसिद्ध करत चाचण्या थांबवण्यात आल्याची माहिती दिली. "आम्हाला आमच्या लशीच्या सर्व चाचण्या थांबवल्या आहेत. यात तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचाही समावेश आहे. चाचण्यादरम्यान लस देण्यात आलेला एक स्वयंसेवक अचानक आजारी पडल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे," असं कंपनीनं म्हटलं आहे.
-
प्रतिकात्मक छायाचित्र
-
जॉन्सन अॅण्ड जॉन्सननं मागील महिन्यातच असं सांगितलं होतं की, त्यांच्या करोनावरील लशीच्या सुरूवातीच्या आणि मधल्या चाचण्यांमध्ये प्रतिकारक शक्ती चांगली दिसून आली आहे. कंपनीनं ६० हजार लोकांना लस दिली होती. जॉन्सन अॅण्ड जॉन्सनला चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत वा नव्या वर्षाच्या सुरूवातील लस मिळण्याची आशा आहे.
-
चाचण्या थांबवण्यात आल्या असल्या तरी जॉन्सन अॅण्ड जॉन्सननं स्वयंसेवकाच्या शरीरावर दिसून आलेल्या वाईट परिणामांविषयी जास्तीची माहिती दिलेली नाही. "आम्ही सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या गोपनीयतेचा सन्मान करतो. स्वयंसेवक आजारी पडण्याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे कोणतीही माहिती देण्यापूर्वी सर्व आकडेवारी दुरूस्त करून घेणं गरजेचं आहे," असं कंपनीनं म्हटलं आहे.
-
जॉन्सन अॅण्ड जॉन्सननं म्हटलं आहे की, चाचण्यांदरम्यान स्वयंसेवकांना अशा प्रकारचे दुष्परिणाम दिसणं सामान्य बाब आहे. प्रतिकूल घटना, आजार व साईड इफेक्ट्सचा यात समावेश होतो. चाचण्यांदरम्यान एखाद्या स्वयंसेवकाचं आजारी पडणं हाही या चाचण्यांचाच भाग आहे. मोठ्या शोधामध्ये अशा गोष्टी घडतात."
-
काही दिवसांपूर्वी अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्डच्या लशीचे दुष्परिणाम दिसून आले होते. त्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या लशीमुळे ब्रिटनमधील एका महिला स्वयंसेवकांच्या हाडामध्ये सूज येऊन ती गंभीर आजारी पडली होती. त्यानंतर कंपनीकडून लशीच्या चाचण्या थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
-
या घटनेच्या काही कालावधीनंतर ऑक्सफर्डकडून सर्व स्वयंसेवकांना पत्र पाठवण्यात आलं होतं. चाचणीदरम्यान महिला स्वयंसेवकाला झालेला त्रास अॅस्ट्राझेनेका लशीमुळे झालेला नव्हता. ही माहिती समोर आल्यानंतर ब्रिटन आणि अमेरिकेनं पुन्हा चाचण्या सुरू केल्या. (Photo: Reuters)

RCB vs GT: विराटला गोलंदाजी करता करता थांबला सिराज, दोघेही झाले भावुक; गिलच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष; VIDEO होतोय व्हायरल