-
तनिष्कच्या जाहिरातीवर लव्ह जिहादचा प्रसार केल्याचा आरोप झाल्याने ही जाहिरात मागे घेण्यात आली मात्र फक्त एकच अशी जाहिरात नाही की ज्यामुळे वाद झालाय तर अनेक अशा जाहिराती आहेत ज्याला वादाची पार्श्वभूमी होती जाणून घेऊया त्याचबद्दल
-
टफ शूज च्या जाहिरातीवरुन १९९५ मध्ये मोठा वादंग झाला होता यामध्ये मॉडेल मिलिंद सोमण आणि मॉडेल मधू सप्रे हे दोघे निर्वस्त्र होते त्यांनी फक्त शूज घातले होते आणि त्यांच्या अंगावर एक अजगर होता. ही जाहिरात चांगलीच वादग्रस्त ठरली होती.
-
२००८ मध्ये कॅलिडा या अंतरवस्त्राच्या जाहिरातीवरुनही चांगलाच वाद झाला होता. ही जाहिरात दिनो मोरिया आणि बिपाशा बसू यांनी केली होती. या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी अनेक महिला संघटनांनी केली होती
-
अभिनेता अभिषेक बच्चनने आयडिया कंपनीबद्दल एक जाहिरात केली होती. या जाहिरातीत त्याने वाढत्या लोकसंख्येचा उल्लेख केला होता ज्यामुळे ही जाहिरात वादग्रस्त ठरली होती. (सर्व फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस)
-
२०१५ मध्ये ऐश्वर्या राय बच्चनची कल्याण ज्वेलर्सची एक जाहिरात समोर आली होती या जाहिरातीत ऐश्वर्याच्या फोटोमागे एका लहान मुलाचा फोटो होता. ही जाहिरात वर्णभेद दाखवणारी आहे आणि बालमजुरीचं समर्थन करणारी आहे असा आरोप झाला होता. ज्यानंतर कल्याण ज्वेलर्सने जाहीर माफी मागून ही जाहिरात मागे घेतली. ही जाहिरात केल्याने ऐश्वर्यावरही टीका झाली होती.
-
२०१७ मध्ये मॅनफोर्स या कंडोम कंपनीने सनी लियोनीची एक जाहिरात बॅनर स्वरुपात समोर आणली होती. आ नवरात्री अ रमो, परंतू प्रेमथी असा मजकूर मॅनफोर्सच्या जाहिरातीवर होता ज्यावरुन बराच वाद झाला होता. या जाहिरातीविरोधात आंदोलनंही झाली होती.
-
जावेद हबीबने त्याच्या सलूनच्या जाहिरातीत हिंदू देवतांचा संदर्भ घेतला होता. देवही ज्या सलूनला भेट देतात ते जावेद हबीब सलून अशी जाहिरात करण्यात आली होती ज्यावरुन चांगलाच वाद झाला ज्यानंतर जावेद हबीबने जाहीर माफीही मागितली.
-
मल्याळी भाषेतील प्रसिद्ध असलेल्या गृहलक्ष्मी या मासिकाच्या मुखपृष्ठावर स्तनपान करणाऱ्या मॉडेलचा फोटो छापण्यात आला होता. यावरही अनेकांनी टीका केली होती.
-
२००७ मध्ये आलेली अमूल माचोची ही अंतरवस्त्रांची जाहिरातही चांगलीच वादग्रस्त ठरली होती. या जाहिरातीचे म्युझिक आणि मॉडेलच्या चेहऱ्यावरचे हावभाव यावरुन वादंग निर्माण झाला. केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने यामध्ये लक्ष घालून या जाहिरातीवर बंदी आणली
-
वाईल्ड स्टोन डिओड्रंडच्या २००७ मध्ये आलेल्या जाहिरातीवरूनही चांगलाच वाद निर्माण झाला होता. दुर्गा पूजा सुरु असताना एक तरुण हा डिओ लावून येतो आणि त्यानंतर दुर्गा पूजा करणाऱ्या महिलेच्या लैंगिक भावना जागृत होतात असं यात दाखवण्यात आलं होतं. या जाहिरातीवरही बंदी घालण्यात आली आहे.
-
२०१० मध्ये आलेली झटॅक परफ्युमची टीव्ही कमर्शियलही वादग्रस्त ठरली होती. या जाहिरातीवरही बंदी घालण्यात आली आहे.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य