-
देशामधील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आल्यानंतरही करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या भागांना सील करण्यात येत आहे. शक्य त्या सर्व मार्गांनी करोनाचा फैलाव थांबवण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र असत असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दिलेल्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांची संख्याही जास्तच आहे. अशा लोकांवर पोलीस कारवाई केली जात आहे. तरीही रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या कमी होतानाचे चित्र दिसत नाही. त्यामुळेच महाराष्ट्र पोलिसांनी मागील काही आठवड्यांपासून सोशल नेटवर्किंगवरुन घरीच थांबा, मास्क घाला, करोनाचा फैलाव होणार नाही यासंदर्भात काळजी घ्या, ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या असे एक ना अनेक जनजागृतीचे संदेश अगदी हटके स्टाइलने मिम्सच्या भाषेत देण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आता महाराष्ट्र पोलिसांनी मराठी मालिकांची नाव वापरुन मास्क आणि करोनासंदर्भातील काही पोस्टर्स ट्विट केलेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पुढील 'एपिसोड' मध्ये काय होणार हे तुम्हीच ठरवू शकता! चला, सर्व खबरदारी घेऊन या 'सिरीयल'चा शेवट करूया असं म्हणत केलेल्या या ट्विटमधील महाराष्ट्र पोलिसांची क्रिएटीव्हीटी पाहुयात…
-
तुला पाहते रे पण…
-
असंभव आहे म्हणे
-
मास्क न वापरल्याने…
-
ते नियमितपणे हात धुतात आणि तुम्ही?

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक