-
सध्याच्या काळामध्ये जोडप्यांमध्ये पोस्ट वेडिंग फोटो शूटची प्रचंड क्रेझ आहे. वेगवेगळ्या थीमवर आधारित कपडे घालून निसर्ग सौंदर्याने नटकलेल्या ठिकाणी फोटोग्राफर्सच्या मदतीने भन्नाट फोटोशूट करण्याचा सध्या ट्रेण्डच आहे. मात्र यंदा करोनामुळे २०२० मध्ये लग्न आणि त्यासंदर्भात सर्वच गोष्टींना जसा फटका बसला आहे तसेच फोटोग्राफीबद्दलही झालं आहे. मात्र असाच फटका बसलेल्या केरळमधील एका जोडप्याने नुकतचं एक फोटो शूट केलं आणि ते चर्चेत आलं आहे या फोटोशूटमधील बोल्ड फोटो व्हायरल झाल्याने. (सर्व फोटो Facebook/Weddingstoriesphotography वरुन साभार)
-
ऋषि कार्तिकेयन आणि लक्ष्मी या दोघांचे १६ सप्टेंबर रोजी लग्न झालं. मात्र त्यानंतर त्यांनी पोस्ट वेडिंग फोटो शूट करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या अखिल कार्तिकेयन या फोटोग्राफर मित्रासोबत केरळमधील इडुक्की येथील चहाच्या मळ्यांमध्ये पोहचले.
-
या सर्व प्रकरणानंतर मी माझ्या पालकांशी याविषयावर सविस्तर चर्चा केलीय असंही लक्ष्मी सांगते. "लोकं वेगवेगळ्या प्रकारची असतात याची त्यांना जाणीव झाली आहे. प्रत्येकाची मतं आणि सल्ले ऐकत राहणं शक्य नाही. तसं केल्यास काहीच करता येणार नाही हे त्यांना समजलं आहे," असं लक्ष्मी म्हणाली.
-
या चहाच्या मळ्यांनी लक्ष्मी आणि ऋषिने केलेलं फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे कारण या फोटोशूटमधील फोटो व्हायरल झालेत. या फोटोंमध्ये हे जोडपं चहाच्या शेतांमध्ये अंगाभोवती पांढऱ्या रंगाच्या चादरी ओढून रोमान्स करताना दिसत आहे.
-
काही फोटोंमध्ये या दोघे चहाच्या मळ्यांमधून धावताना दिसत आहेत तर काही ठिकाणी हे दोघे अंगावर चादर ओढून रोमान्स करताना दिसतात. या फोटोशूटमधील हे फोटो व्हायरल झाले असून अनेकांना ते आवडलेले नाहीत. सोशल मीडियावर अनेक युझर्सचे या जोडप्याला ट्रोल केलं आहे. काही युझर्सने हे फोटोशूट अर्धनग्न अवस्थेत करण्यात आल्याची टीका केली आहे तर काहींनी कोणतही नातं जगजाहीरपणे मान्य करणं चांगलं असलं तरी अशापद्धतीने फोटो सार्वजनिक माध्यमांमध्ये पोस्ट करणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
-
मात्र ट्रोलर्सला या दोघांनाही जशाच तसे उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे. "सामान्यपणे अनेक लग्नाच्या फोटोंमध्ये पारंपारिक कपड्यांमध्ये वधू-वर असतात. हात पकडून मंदिरामध्ये फेरे मारतानाच हे फोटो असतात. मात्र आम्हाला काहीतरी वेगळं हवं होतं त्यामुळे आम्ही पोस्ट वेडिंग फोटोशूटचा निर्णय घेतला," असं ऋषिने 'द न्यूज मिनट'शी बोलताना सांगितलं. या फोटोशूटची संपूर्ण कल्पना ही ऋषिचा मित्र असणाऱ्या अखिलची आहे. अखिल हा प्रोफेश्नल फोटोग्राफर असून त्याची वेडिंग शूटिंगसंदर्भातील कंपनी त्रिसुरमधील पेरुंबवूर येथे आहे.
-
हे फोटो शूट अश्लील असल्याची टीका करणाऱ्यांना उत्तर देताना ऋषिने, "आम्ही कपडे घातली नव्हती असं शक्यच नाही. कारण आम्ही बाहेर शूटिंग करत होतो. आम्ही कपडे घालूनच हे शूट केलं आहे. हे फोटो म्हणजे फोटोग्राफरच्या उत्तम नजरेचा कमाल आहे. त्याने ज्यापद्धतीने आपल्या कॅमेरातून हे फोटो शूट केले आहेत त्यामुळे अनेकांचा गैरसमज झाला आहे. मात्र हे समजून न घेता सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी मॉरल पोलिसिंगच्या नावाखाली मला आणि माझ्या पत्नीला या फोटोंवरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली," असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर यावरुन ट्रोलिंग सुरु असलं तरी आम्हा दोघांच्या घरच्यांनी या फोटोंवर आक्षेप घेतला नाही असं ऋषि सांगतो.
-
"मी ऑफ शोल्डर्स आणि शॉर्ट घालणाऱ्या मुलींपैकी आहे. मी माझे पाय आणि मान दाखवणं याला नग्नता आहे असं म्हणता येणार नाही. मात्र हे फोटो फेसबुकवर पोस्ट करण्यात आले तेव्हा कमेंटमधून माझ्यावर टीकेला भडीमार करण्यात आला. आधी आम्ही काही कमेंटला रिप्लाय दिला नंतर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर ट्रोलर्सला उत्तर देणं कठीण झालं. त्यामुळे आम्ही याकडे दूर्लक्ष करण्याचं ठरवलं," असं लक्ष्मीने 'द न्यूज मिनट'शी बोलताना सांगितलं.
-
"केरळमध्ये महिलांनी साडी सोडून इतर कपडे परिधान केली तर लगेच त्यांना टीकेचा सामना करावा लागतो. त्यानंतर मॉरल पोलिसिंग आणि नको त्या प्रतिक्रिया ओघाने आल्याच," असं ऋषि सांगतो. बरं आधी या फोटोशूटबद्दल काहीच अडचण नसणारे लक्ष्मीचे पालक ट्रोलर्सने केलेल्या टीकेनंतर चिंतेत पडले असंही ऋषिने म्हटलं आहे.
-
"ते कायम या विषयासंदर्भातील खासगी गोष्टींची चर्चा करतात. तसेच चार भिंतींच्या आतमध्ये होणाऱ्या गोष्टी अशा पद्धतीने का शूट केल्या असा प्रश्न विचारतात. इंटरनेटवर तर अनेकांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टीका केली असून काहींनी तर तुम्ही आतमध्ये कपडे घातले होते का असे प्रश्नही विचारलेत," अशा शब्दांमध्ये लक्ष्मीने आपला संताप व्यक्त केला.
-
या सर्व प्रकरणानंतर मी माझ्या पालकांशी याविषयावर सविस्तर चर्चा केलीय असंही लक्ष्मी सांगते. "लोकं वेगवेगळ्या प्रकारची असतात याची त्यांना जाणीव झाली आहे. प्रत्येकाची मतं आणि सल्ले ऐकत राहणं शक्य नाही. तसं केल्यास काहीच करता येणार नाही हे त्यांना समजलं आहे," असं लक्ष्मी म्हणाली. अनेकांनी ट्रोल करुनही ऋषि आणि लक्ष्मीने हे फोटो फेसबुकवरुन काढायचे नाहीत असं ठरवलं आहे. ट्रोलर्सला उत्तरं द्यायची नाहीत किंवा त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करायची नाही असा निर्णय या दोघांनी घेतला आहे. "एक दोन दिवसांमध्ये हे सर्व शांत होईल आणि ट्रोलर्सला उत्तर देण्यात मला माझी ऊर्जा वाया घालवायची नाहीय. त्यामुळे मी पोलिसांकडे तक्रार करणार नाहीय," असं ऋषि सांगतो.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य