-
प्रातिनिधीक छायाचित्र
-
महाआघाडी विरुद्ध एनडीए अशी सरळ लढत बिहारच्या राजकीय मैदानात बघायला मिळणार आहे. मात्र, त्याचबरोबर निवडणुकीच्या मैदाना उतरलेल्या काही महिला उमेदवारही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
-
बिहारमधील राजकारणाचा सामाजिक पोत बदलताना दिसत आहे. पत्नी किंवा मुलाकडे राजकीय वारसा सोपवण्याकडे कल असणाऱ्या बिहारमध्ये आता मुली आणि सुनांकडे नेतृत्व येताना दिसत आहे. यापैकी काही चर्चेतील उमेदवारांची ही नावं.
-
पुष्पम प्रिया चौधरी… जदयूचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद चौधरी यांची कन्या. पुष्पम चौधरी यांनी लंडनमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केलं आहे. पुष्पम प्रिया यांनी वडिलांच्या जदयू पक्षातून राजकीय सुरूवात करण्याऐवजी स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला आहे. प्लुरल्स पार्टी. त्या स्वतः मधुबनी जिल्ह्यातील बिस्फी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर पक्षही संपूर्ण राज्यात निवडणूक लढवत आहे.
-
दिव्या प्रकाश… राजद नेते आणि माजी मंत्री प्रकाश नारायण यांची मुलगी. दिव्या प्रकाश यांनी वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी बिहारच्या राजकारणात पाऊल ठेवलं आहे. त्या राजदच्या तिकिटावर तारापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
-
श्रेयसी सिंह… बिहारच्या राजकारणात प्रसिद्ध असलेले नेते स्व. दिग्विजय सिंह यांची मुलगी. श्रेयसी या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. त्या भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत.
-
मीना कामत…जदयूचे नेते कपिलदेव कामत प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांची सून मीना कामत या निवडणूक लढवत आहे. त्या बाबूबरही मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्या जिल्हा परिषद सदस्या होत्या.
-
शालिनी मिश्रा… जदयूनं यावेळी केसरिया विधानसभा मतदारसंघातून शालिनी मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे. शालिनी मिश्रा या माजी खासदार स्व. कमला मिश्रा यांच्या कन्या आहेत. शालिनी यांनी एमबीएपर्यंतचं शिक्षण घेतलेलं असून, अनेक ठिकाणी नोकरीही केलेली आहे. आता त्या आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी राजकीय मैदानात उतरल्या आहेत.
-
नीतू सिंह… बिहारचे माजी पशु संवर्धन राज्यमंत्री स्व. आदित्य सिंह यांची सून नीतू सिंह या यावेळी हिसुआ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे.
-
डॉ. निक्की हेम्ब्रम… हेम्ब्रम या भाजपाचे माजी आमदार सोनेलाल हेम्ब्रम यांची सून आहेत. निक्की हेम्ब्रम या भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत. मागील निवडणुकीत त्यांचा राजद उमेदवारानं पराभव केला होता. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केलं आहे. मागील काही वर्षांपासून त्या सासऱ्याचा राजकीय वारसा सांभाळत आहेत.
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य