-
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली 'महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेची' नवी कार्यकारिणी जाहीर केली.
-
यादरम्यान, राज ठाकरे यांना एक अनोखी भेट देण्यात आली.
-
चांदीच्या शिक्क्यामध्ये राज ठाकरे यांची प्रतीमा असलेलं स्मृतीचिन्ह त्यांना भेट म्हणून देण्यात आलं.
-
या स्मृतीचिन्हात राज ठाकरे यांच्या प्रतीमेशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडणूक चिन्ह असलेले रेल्वे इंजिनदेखील आहे.
-
"राज ठाकरे यांच्यासाठी चांदीच्या स्वरूपातील त्यांचे छायाचित्र असलेले आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचं चिन्ह असलेलं स्मृतीचिन्ह तयार करण्याची इच्छा मनात होती. ती आता पूर्णत्वास आली आहे," अशी प्रतिक्रिया यशवंत किल्लेदार आणि आनंद प्रभू यांनी दिली.
-
चांदीच्या शिक्क्यावर राज ठाकरे यांची हुबेहुब प्रतीमा साकारण्यात आली आहे.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य