-
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील 'बाबा का ढाबा' चांगलाच चर्चेत आला होता.
-
लॉकडाउनमुळे आर्थिक कंबरडं मोडलेल्या ८० वर्षीय कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी बदामी देवी यांना मदत करण्यासाठी लोकांनी त्याच्या ढाब्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती.
-
युट्यूबवर गौरव वासन याने हा व्हिडीओ शूट केला होता, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि लोक मदतीसाठी पुढे येऊ लागले.
व्हिडीओ इतका प्रसिद्ध झाला होता की, सोशल मीडियावर #Babakadhaba हॅशटॅगही ट्रेंड झाला होता. (Photo: Instagram) हा व्हिडीओ शूट करुन वयस्कर दांपत्याला मदत केल्याबद्दल गौरवचं खूप कौतुक होत होतं. (Photo: Instagram) -
पण काही दिवसांनी या प्रकऱणाला एक वेगळं वळण मिळालं असून गौरववर आर्थिक मदत चोरल्याचा आऱोप होत आहे.
महत्त्वाचं म्हणजे ज्यांना मदत केली त्याच कांता प्रसाद यांनी गौरववर आरोप केला असून आपल्याला आलेली मदत दिली नसल्याचं म्हटलं आहे. (Photo: Instagram) -
कांता प्रसाद यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही केली आहे.
-
कांता प्रसाद यांनी केलेल्या आरोपानुसार, गौरवन लोकांना आपलं तसंच आपल्या कुटुंबाच्या बँक खात्याचा क्रमांक देत मिळणारी मदत वळती केली आणि ते पैसे परतही केले नाहीत. आता आपल्याला जास्त ग्राहकही मिळत नाही. आधी दिवसाला १० हजार कमवत होतो, आता ३ ते ५ हजारांचा व्यवसाय होतो. लोक जेवण्यासाठी कमी आणि फोटो काढण्यासाठी जास्त येत आहेत.
दरम्यान कांता प्रसाद यांनी केलेल्या आरोपांवर गौरवनेही उत्तर दिलं असून सर्व आरोप निराधार आणि खोटे असल्याचं सांगितलं आहे. (Photo: Instagram) "माझ्याविरोधात खोटे आरोप करुन बदनामी केला जात आहे. माझ्या खात्यात २५ लाख रुपये जमा झाल्याचा दावा केला जात असून खोटा आहे. मी माझं बँक स्टेटमेंट दिलं असून सर्व पैसे कांता प्रसाद यांच्या खात्यात वळवले आहेत. मला २५ लाख रुपये मिळाल्याचं कांता प्रसाद यांच्या डोक्यात कोण भरवतंय माहिती नाही," असं त्याने म्हटलं आहे. (Photo: Instagram) "कांता प्रसाद यांना त्यांच्या खात्यात नेमके किती पैसे आहेत याची कल्पना नसताना माझ्या खात्याबद्दल कसं माहिती असणार? कांता प्रसाद यांनी आपल्या बँक खात्याची माहिती लोकांसमोर ठेवल्यानंतरच सगळं स्पष्ट होईल. जेणेकरुन त्यांच्याकडे किती पैसे होते आणि मी किती दिले हेदेखील स्पष्ट होईल," असं त्याने सांगितलं आहे. (Photo: Instagram) -
"लोक कांता प्रसाद यांच्या डोक्यात अनेक गोष्टी भरत असून त्यांनी दुर्लक्ष केलं पाहिजे. अनेक लोक आपण त्यांचे मॅनेजर असल्याचा दावा करत असून त्यांना कोणी नियुक्त केलं हे माहिती नाही. आपण कांता प्रसाद यांची बँक खाती सांभाळत असल्याचा त्यांचा दावा आहे. लोकांनी स्वत: जाऊन याची माहिती घेतली पाहिजे," असं आवाहन गौरवने केलं आहे.
अशा पद्दतीने बदनामी झाल्यास लोकांचा माणुसकीवरुन विश्वास उठेल असं गौरवचं म्हणणं आहे. असे हजारो बाबा आणि अम्मा आहेत ज्यांना मदत हवी असून लोक माझ्या व्हिडीओनंतर मदत करत आहेत. पण अशा आरोपांमुळे या मदततीत खंड पडत आहे असंही तो म्हणाला आहे. (Photo: Instagram) सत्य समोर आलं पाहिजे अशी मागणी गौरवने केली आहे. (Photo: Instagram)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य