-
लग्न करताना पती आणि पत्नीमध्ये काही ठराविक वयाचं अंतर असावं असं म्हटलं जातं. पण ते किती असावं याबाबत वेगवेगळी मतं आहेत. पण इंडोनेशियात चक्क ७८ वर्षाच्या म्हाताऱ्याने १७ वर्षाच्या तरुणीसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आहे. (Photos: Facebook)
-
दोघांमध्ये ५९ वर्षांचं अंतर असल्याने त्यांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.
-
७८ वर्षीय Abah Sarna यांनी १७ वर्षीय Noni Navita हिच्याशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.
-
लग्नावेळी Abah Sarna यांनी भला मोठा हुंडाही मिळाला होता. ५० हजार रोख रक्कम, दुचाकी तसंच अनेक सामाना हुंड्यात मिळालं होतं.
-
हे सर्व सामान भरण्यासाठी एक ट्रक लागला होता. त्यामुळे हा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
-
पण ज्या वेगाने लग्नाची बातमी सोशल मीडियावर पसरली त्याच वेगाने या दांपत्याचा घटस्फोटही झाला.
-
लग्नाच्या २२ व्या दिवशीच Abah Sarna यांनी घटस्फोस्टाची नोटीस पाठवली.
-
दोघांच्याही नात्यात कोणती समस्या नसताना Abah Sarna यांनी घटस्फोट मागितल्याने Noni Navita यांचे कुटुंबीय आश्चर्य व्यक्त करत आहेत.
-
"आम्हाला नवऱ्यामुलापासून कोणतीही समस्या नाही. कदाचित त्यांच्या कुटुंबातून लग्नाला विरोध झाला आहे," असा दावा Noni Navita च्या बहिणीने केला आहे.
-
घटस्फोटासाठी अनेक दावे केले जात आहेत. यामधील एक दावा Noni Navita लग्नासाठी गरोदर होती असा आहे. पण तिच्या बहिणीने तो फेटाळला आहे.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य