-
Chirag Paswan House : लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान हे आपले वडील रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पक्ष आणि कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. चिराग पासवान हे आपल्या आईसोबत पाटण्यातील घरात राहतात. त्यांचं दिल्लीतही एक घर आहे. अनेकदा त्यांच्या घराची चर्चा सुरू असते. तर पाहूया त्यांच्या घराची एक झलक.
-
घराच्या आतमध्ये रामविलास पासवान यांनी आपल्या वडिलांची मूर्ती बसवली आहे.
-
त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी एकत्र जमून त्यांना श्रद्धांजली अर्पित करतात.
-
घराच्या आतमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो लावण्यात आले आहेत.
-
त्यांच्या घरातील बैठक व्यवस्थाही अतिशय उत्तम आहे.
-
याठिकाणी राम विलास पासवान यांचाही मोठा फोटो लावण्यात आला आहे. अनेकदा रामविलास पासवान आणि चिराग पासवान या ठिकाणी राजकीय चर्चा करताना दिसले होते.
-
चिराग पासवान यांच्या तीन बहिणी आहेत.
-
रामविलास पासवान यांनी दोन लग्न केली होती. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं.
-
वडिलांच्या निधनानंतर चिराग पासवान हे राजकारणात अधिक सक्रिय झाले आहेत. आपल्या पक्षाची धुरा ही त्यांच्याच खांद्यावर आहे.
-
८ ऑक्टोबर २०२० रोजी रामविलास पासवान यांचं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते.
-
रामविलास पासवान यांनी केंद्रात अनेकदा मंत्रीपदही भूषवलं होतं.
वेश्याव्यवसायातून महिलेची १५ वर्षांनी झाली सुटका, घरी पोहोचताच कुटुंबियांनी…