-
जपानच्या राजकुमारीच्या लग्नाचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जपानची राजकुमारी माकोने पुन्हा एकदा आपलं लग्न पुढे ढकललं आहे. (Photo: AP)
-
अत्यंत सुंदर दिसणाऱ्या राजकुमार माकोला एक भीती सतावत असून यामुळेच तिने पुन्हा एकदा लग्न पुढे ढकललं आहे. (Photo: Reuters)
-
जपानची राजकुमारी आकंठ प्रेमात असूनही लग्न करण्यापासून मात्र दूर पळत आहे. जपानच्या राजकुमारीला लग्न तर करायचं आहे पण असं केल्याने एक मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे ज्याची तिला भीती वाटत आहे.
-
राजकुमारी माकोने लग्न टाळण्याची ही दुसरी वेळ आहे. (Photo: Reuters)
-
याआधी तीन वर्षांपूर्वी २०१७ मध्ये राजकमुारी माकोने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण लग्न जवळ येताच माकोने निर्णय रद्द केल्याचं समजलं होतं. (Photo: Gettyimage)
-
माको आणि केई कोमुरो गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असून सोशल मीडियावरही दोघांची चांगलीच चर्चा असते. (Photo: Reuters)
-
आठ वर्षांपूर्वी राजकुमारी माको आणि केई कोमुरो यांची भेट भेटली होती. त्याचक्षणी माको प्रेमात पडली. हे दोघंही टोकियोतल्या एका कॉलेजमध्ये शिकायचे. (Photo: Reuters)
-
राजकुमारी माको ज्याच्यावर प्रेम करते तो कोमुरो एक सामान्य नागरिक आहे. कोमुरो पर्यटन व्यवसायात आहे.
-
जपानच्या राजघराण्याचे अनेक नियम आहेत. त्यानुसार मोकाने बाहेरील व्यक्तीशी लग्न केल्यास तिचे राजकुमारीचे पद काढून घेतले जाईल. तसेच तिला सामान्य माणसाप्रमाणेच आयुष्य देखील व्यतित करावे लागेल. (Photo: Reuters)
-
यामुळेच राजकन्या मोको वारंवार लग्न टाळत आहे.
-
मोकाच्या आत्याने २००५ मध्ये टोकियोच्या एका अधिका-याशी लग्न केलं होतं. त्यानंतर मोकाच्या आत्येला आपलं पद गमवावं लागलं होतं. आपल्यालाही पद गममावं लागेल अशी भीती माकोला आहे. (Photo: Reuters)
-
गेल्या तीन पिढ्यांपासून जपानमधल्या राजघराण्यातील सदस्यांना सामान्य व्यक्तींसोबत विवाह करण्याची परवानी देण्यात आली आहे. यानुसार राजपदावरील कोणतीही व्यक्ती राजघराण्याव्यतिरिक्त सामान्य जनतेशी विवाह करू शकतो. मात्र जर राजघराण्यातील स्त्रियांना विवाह करायचा असेल तर मात्र त्यांना राजपद आणि ऐशोआरामाचा त्याग करावा लागतो. राघराण्यातील नियमाप्रमाणे ती स्त्री शाही कुटुंबाचा भाग राहत नाही. (Photo: Reuters)
“मी एकटाच वेगळा…”, नाना पाटेकरांनी पत्नीबरोबर न राहण्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिचे खूप उपकार…”