-
इंडोनेशियामध्ये शवपेट्या बनवण्याचा व्यवसाय करणाऱ्या ३३ वर्षीय जोसुआ हुतागलुंग नावाची व्यक्ती अवघ्या काही मिनिटांमध्ये कोट्याधीश झालीय. जोसुआच्या घरात आकाशातून एक अनमोल ऐवज पडला आणि तो १० कोटींचा मालक झाला. जोसुआच्या घरात एक उल्कापिंड पडला. या उल्कापिंडाचा अभ्यास करण्यात आला असता हा साडेचार अरब वर्ष जुना दुर्मीळ उल्केचा भाग असल्याचे लक्षात आलं. या उल्कापिंडाची किंमत १.३ मिलियन पाउंड इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. (सर्व फोटो सोशल मिडियावरुन साभार)
-
जोसुआने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा उल्कापिंड पडला तेव्हा तो आपल्या उत्तर सुमात्रामधील कोलांग येथे असणाऱ्या घरातच होता. घरातील छोटं मोठं काम करत असतानाच अचानक मोठा आवाज ऐकू आला. त्यामुळे आपल्या खोलीचा दरवाजा उघडून जोसुआ हॉलमध्ये आला तेव्हा घराच्या छप्पराला मोठं भगदा़ड पडल्याचं त्याला दिसलं तर जमिनीवर एक मोठ्या आकाराचा दगड दिसून आला.
-
या उल्कापिंडाचे वजन जवळजवळ दोन किलोहून थोडे अधिक आहे. आपल्या घरातील फरशीवर १५ सेंटीमीटरचा खड्डा झाल्याचेही जोसुआने सांगितलं. घराला नुकसान झालं असलं तरी जोसुआसाठी हा उल्कापिंड फायद्याचा ठरला. या उल्कापिंडासाठी जोसुआला १४ लाख पाउंड म्हणजेच १० कोटी रुपये मिळालेत.
-
स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जोसुआने स्वत: खड्डा खोदून हा उल्कापिंड आहे त्या मूळ आकारामध्ये जमीनीच्या बाहेर काढल्याने त्याला यावर मालकी हक्क सांगता आला. हा उल्कापिंड अत्यंत दुर्मिळ प्रकारातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या उल्कापिंडाची किंमत प्रतिग्राम ८५७ डॉलर म्हणजेच ६३ हजारांहून अधिक आहे.
-
जोसुआने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा हा उल्कापिंड जमीनीतून काढला तेव्हा तो खूपच गरम होता. उल्कापिंड एवढ्या वेगाने घरावर पडला की घराचा काही भाग भूकंपाचा धक्का बसल्याप्रमाणे हदरला असंही जोसुआने सांगितलं. घराच्या छप्पराला पडलेल्या छिद्राचा आकार पाहून हा दगड आकाशातून पडल्याचे मला पाहता क्षणीच कळलं. कारण माझ्या घरावर एवढ्या मोठ्या आकाराचा दगड फेकणं शक्य नाही, अशा शब्दांमध्ये जोसुआने पाहता क्षणीच हा उल्कापिंड असल्याची खात्री पटल्याचे सांगताना म्हटलं.
-
स्थानिकांनीही मोठा आवाज ऐकू आल्याचे सांगितले. हा उल्कापिंड पाहाण्यासाठी स्थानिकांनी जोसुआच्या घरी गर्दी केली होती. अनेक लोकं माझ्या घरी हा उल्कापिंड पाहण्यासाठी येत आहेत आणि अगदी उत्सुकतेने त्याबद्दल माहिती घेत आहेत असं जोसुआ म्हणाला. ३० वर्ष काम करुन जोसुआला जेवढा पगार मिळाला असता तेवढं धन त्याला हा उल्कापिंड विकून मिळालं आहे. या पैशातील काही भाग हा आपल्या समाजातील लोकांसाठी चर्च उभारण्यासाठी वापरणार असल्याचे जोसुआ सांगतो.

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’