-
सोशल मीडियावर सध्या #FirstSalary असा एक ट्रेंड सुरू आहे. यामध्ये काही लोकं आपली पहिली सॅलरी, पहिली नोकरी आणि आपलं वय सांगत असतात. बॉलिवूडचे काही सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. अमिताभ बच्चन यांच्यापासून अली फजलपर्यंत अनेकांनी आपली पहिली सॅलरी किती होती हे सांगितलं.
-
अमिताभ बच्चन यांची पहिली सॅलरी ५०० रूपये होती. कोलकातामधील एका शिपिंग फर्ममध्ये काम करताना त्यांना ५०० रूपये देण्यात येत होते.
-
शाहरूख खानची पहिली सॅलरी ५० रूपये होती. दिल्लीत पंकज उधास यांच्या एका कॉन्सर्टमध्ये काम केल्याचा मोबदला म्हणून त्याला ५० रूपये देण्यात आले होते. या पैशातून शाहरूखनं ताजमहाल पाहिल्याचं सांगितलं.
-
हृतिक रोशन याला पहिली सॅलरी म्हणून १०० रूपये मिळाले होते. आपल्याच वडिलांच्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केल्याचा मोबदला म्हणून त्याला हे पैसे देण्यात आले होते.
-
अक्षय कुमारला बँकॉकमधील एका रेस्तराँमध्ये काम केल्याचा मोबदला म्हणून १ हजार ५०० रूपये देण्यात येत होते. ही त्याची पहिली कमाई होती.
-
अभिनेत्री म्हणून काम करण्यापूर्वी सोनम कपूर संजय लीला भन्साळी यांना असिस्ट करत होती. त्यावेळी तिला ३ हजार रूपये देण्यात आले होते.
-
अली फजलची पहिली सॅलरी ८ हजार रूपये होती. १९ वर्षांचा असताना आपल्या कॉलेजची फी भरण्यासाठी तो कॉल सेंटरमध्ये काम करत होता. त्यावेळी त्याला ८ हजार रूपये सॅलरी मिळत होती.

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ