-
ऑनलाईन स्ट्रीमिंग अॅप नेटफ्लिक्सने ५ व ६ डिसेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्व शो, वेब सीरिज, मुव्ही मोफत उपलब्ध करून दिले आहेत.
-
नेटफ्लिक्सने याला नेटफ्लिक्स स्ट्रीमफेस्ट असं नाव दिलं आहे. ५ व ६ डिसेंबरला संपूर्ण भारतात कुणालाही नेटफ्लिक्स मोफत बघता येणार आहे.
-
दोन दिवसांसाठी नेटफ्लिक्स मोफत उपलब्ध होणार असल्यानं प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण असून, सोशल मीडियावरही हा आनंद दिसून येतं आहे. भन्नाट मीम्स व्हायरल होत आहे.
-
स्ट्रीम फेस्ट सुरू झालं आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता स्ट्रीम फेस्ट सुरू झाला आहे.
-
दोन दिवसांसाठी नेटफ्लिक्स फ्री झाल्यावर अनेक मीम्स व्हायरल होत आहे. त्याचबरोबर इतर अॅपवरूनही नेटफ्लिक्स बघणाऱ्यांविषयी मीम्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
-
या नव्या सेवेमध्ये नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेला सर्व कार्यक्रम मोफत बघता येणार आहे.
-
पैसे न भरता नेटफ्लिक्सवरील कोणतीही वेब सीरिज, शो, चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे.
-
नेटफ्लिक्सवरील नव्या यूजर्ससाठी स्ट्रीमफेस्टसाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत.
-
स्ट्रीमफेस्टसाठी लॉगइन केल्यानंतर यूजर्सला नेटफ्लिक्सवरील सर्व शो बघता येणार आहे.
-
मागील महिन्यात नेटफ्लिक्सने भारतासह जगातील अनेक देशांमध्ये मोफत सबस्क्रिप्शन देणं बंद केलं आहे.

घटस्फोटानंतर अडीच महिन्यांनी मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे निधन, म्हणाली, “मला थोडा…”