-
ब्राझिलचे डॉ. डिएगो राबेलो यांनी स्वत:शीच लग्न केलं आहे.
-
३३ वर्षीय डिएगो यांचं होऊ घातलेलं लग्न अचानक मोडलं. मात्र निराश न होता त्यांनी एक आगळावेगळा निर्णय घेतला आणि स्वत:शीच लग्न करण्याचं ठरवलं.
-
झालं असं की डिएगो आणि व्हिटर बुईनो यांचा मागील वर्षी एन्गेजमेंट झाली होती. नोव्हेंबर २०१९ मध्ये एन्गेजमेंट झाल्यानंतर दोघेही सप्टेंबरमध्ये लग्न करणार होते.
-
मात्र व्हिटरने आपल्याला लग्न करायचे नाही असं सांगितलं आणि डिएगो यांचं ठरलेलं लग्न मोडलं. मागील अनेक महिन्यांपासून त्यांची सोबत देणारी त्यांची प्रेयसीने लग्नाच्या काही दिवस आधीच लग्नाला नकार दिला.
-
डिएगो यांनी खचून जाता ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तोही स्वत:शीच. आपलं लग्न सुमद्रकिनारी व्हावं अशी डिएगो यांची इच्छा होती.
-
डिएगो यांच्या इच्छेनुसार मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये समुद्रकिनाऱ्यावर ठरलेल्या दिवशीच संपूर्ण रीती-रिवाजांसह स्वतःशीच लग्न केलं.
-
विशेष म्हणजे डिएगो यांनी लग्नाचं आमंत्रण दिलेल्या लोकांपैकी ८० टक्के पाहुण्यांनी या लग्नाला हजेरी लावली.
-
या लग्नाला काही महिने पूर्ण झाले असेल तरी यासंदर्भातील फोटो आता इंटरनेटवर व्हायरल झालेत. निराश न होता आहे त्या परिस्थितीला तोंड देत डिएगो यांनी घेतलेल्या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे.
-
डिएगो यांनी आपल्या कृतीमधून स्वत:वर प्रेम करण्याचा अनोखा मार्ग दाखवला आहे, जो स्वत:वर प्रेम करतो तो इतरांवर करु शकतो अशा अनेक प्रकारच्या कमेंट या फोटोंवर दिसून येत आहे.
-
आजकाल काहीजण जोडीदार न शोधता स्वतःशीच लग्न करतात. यापूर्वीही डिएगो यांच्याप्रमाणेच अनेकांनी स्वत:शीच लग्न केलं आहे. या अशा लग्नांना सोलोगॅमी म्हणून ओळखलं जातं. (सर्व फोटो : Instagram/drdiogorabelo वरुन साभार)

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?