-
पुण्यातील दोन शाळकरी मुलांनी आभाळ ठेगणं वाटावं, अशी कामगिरी केली आहे. या विद्यार्थ्यांनी खगोल विज्ञान क्षेत्रात महत्त्वाचा शोध लावला आहे. अंतराळात सहा लघुग्रहाचा त्यांनी शोध लावला आहे. लघुग्रहांचा शोध घेत असताना त्यांना असं दिसून आलं की, हे सहा लघुग्रह २७ लघुग्रहांचाच भाग होते. (सर्व छायाचित्र प्रातिनिधीक/इंडियन एक्स्प्रेस)
-
कलाम सेंटर आणि आंतरराष्ट्रीय एस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅबरेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लघुग्रह शोध मोहिमेदम्यान दोन्ही विद्यार्थ्यांनी हा शोध लावला. या अभियानासाठी ९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर याकालावधीत एका जागतिक स्तरावरील कार्यक्रमाद्वारे २२ जणांची निवड करण्यात आली होती.
-
जगभरातून निवडण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांना मंगळ आणि गुरू या दोन्ही ग्रहांच्या कक्षांमधील स्थिती आणि पृथ्वीजवळील संभावित असलेल्या लघुग्रहाचं विश्लेषण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं होतं. सहभागी झालेल्या स्पर्धकांनी २७ प्राथमिक लघुग्रहांचा शोध घेतला.
-
यात सहा लघुग्रहांचा शोध पुण्यातील दोन विद्यार्थ्यांनी लावला आहे. हे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील लोहगावमध्ये असलेल्या विखे पाटील शाळेचे विद्यार्थी आहेत. आर्या पुळाटे आणि श्रेया वाघमारे अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत. (Photo : AP)
-
शोधण्यात आलेले हे लघुग्रह मंगळ आणि गुरू या दोन्ही ग्रहांच्या कक्षेच्या दरम्यान दिसून आले आहेत. लघुग्रहांना छोटे ग्रह म्हणून नोंदवण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागतो. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे माजी सल्लागार आणि कलाम सेंटरचे संस्थापक श्रीजनपाल सिंह यांनी सांगितलं की, या लघुग्रहांना ओळखण्यासाठी आणि त्यांचं आरेखन करण्यासाठी आम्ही लावलेला शोध महत्त्वाचा आहे."

२३ मार्च पंचांग: रविवारी ‘या’ राशींना होईल अचानक धनलाभ; तर सिंह, कुंभसह यांचे होईल चारचौघात कौतुक, वाचा १२ राशींचे भविष्य