-
पुण्यात पूजा चव्हाण या 'टिक-टॉक'वरून प्रसिद्धीस आलेल्या तरुणीने आत्महत्या केली. सुरूवातीला आत्महत्येपूरत मर्यादित असलेलं हे प्रकरण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्वलंत मुद्दा बनलं आहे. पूजा चव्हाण, संजय राठोड यांच्याभोवती फिरणाऱ्या या प्रकरणात एका नावाची चर्चा होतेय, ती म्हणजे भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचं. (संग्रहित छायाचित्र)
-
भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणात थेट राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत गंभीर आरोप केले होते. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून राजीनामा घेण्याची मागणीही सातत्यानं चित्रा वाघ यांच्याकडून केली जात आहे. (सर्व छायाचित्रं/ चित्रा वाघ इन्स्टाग्राम)
-
पूजा चव्हाण प्रकरणावरून चित्रा वाघ थेट ठाकरे सरकारला भिडताना दिसत आहे. त्यामुळे चित्रा वाघ नेमक्या कोण आहेत? त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय? याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दिसत आहे. तर जाणून घेऊया भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची राजकीय कारकीर्द. (सर्व छायाचित्रं/ चित्रा वाघ इन्स्टाग्राम)
-
चित्रा वाघ सध्या भाजपा आहेत. मात्र, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा असल्यापासूनच त्या चर्चेत आहेत. अखिल भारतीय सेनेतून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. सतत राज्यभर दौरे करणाऱ्या चित्रा वाघ यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात दाखल झाल्या होत्या.
-
विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधून भाजपात जाणाऱ्या नेत्यांची रीघ लागली होती. त्याच काळात चित्रा वाघ यांनी कमळ हाती घेतलं होतं. (सर्व छायाचित्रं/ चित्रा वाघ इन्स्टाग्राम)
-
चित्रा वाघ यांनी भाजपाची वाट धरली, तेव्हा चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणाच्या चौकशीच्या फेऱ्यापासून वाचण्यासाठी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली गेली होती.
-
हे प्रकरण चर्चेत असताना चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गंत गटबाजीमुळं त्या नाराज होत्या आणि म्हणून त्यांनी पक्ष सोडला असल्याचंही बोललं गेलं होतं. (सर्व छायाचित्रं/ चित्रा वाघ इन्स्टाग्राम)
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गटबाजीचं राजकारण नाही. चित्रा वाघ या गटबाजीमुळे नाराज होऊन पक्ष सोडून गेल्या यात तथ्य नाही. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा", असं शरद पवार म्हणाले होते.
-
चित्रा वाघ या २० वर्षं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या. राष्ट्रवादीत असताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याबरोबर बरीच वर्षं काम केलं. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीची सत्ता असताना चित्रा वाघ या राज्य महिला आयोगाच्या सदस्याही होत्या. (सर्व छायाचित्रं/ चित्रा वाघ इन्स्टाग्राम)
-
भाजपात दाखल झाल्यानंतर चित्रा वाघ सक्रिय झाल्या होत्या. विशेषतः भाजपा विरोधी बाकांवर गेल्यापासून त्यांनी महिला अत्याचार आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर त्या सातत्याने सरकारला जाब विचारताना दिसत आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत असताना चित्रा वाघ थेट सरकारला प्रश्न विचारून कोडींत पकडताना दिसत आहे.
-
दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणावरून रणकंदन सुरू असताना चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांचं लाचलुचपत प्रकरण चर्चेत आलं आहे. एसीबीने किशोर वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आपण पूजा चव्हाण प्रकरणावरून सरकारला सवाल करत असल्यानं आपल्या पतीला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. (सर्व छायाचित्रं/ चित्रा वाघ इन्स्टाग्राम)
-

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच