-
गेल्या वर्ष भरापासून करोनामुळे आपल्या जीवनशैलीवर परिणाम झाला आहे. कधी कोणी विचार केला होता का? की लोक घरात मास्क वापरतील. करोनापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी मास्क घाला आणि सोशल डिस्टंसिंगचे पालण करण्यास सांगितले जाते. तर लग्नात किंवा कोणत्याही कार्यक्रमात एक स्त्री ही नटून थटून जाते. मात्र, करोनामुळे मास्क परिधान करत असल्यामुळे त्याना मेकअप आणि दागिने सुद्धा घालता येत नाही. कारण मास्कमुळे ते सगळं लपूण जातं. दरम्यान, सोशल मीडियावर एक महिलेचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. आपला दागिना लपला नाही पाहिजे म्हणून त्या महिलेन एक उपाय काढल्याचे त्या फोटोतून दिसतं आहे. (Photo Credit : Dipanshu Kabra Twitter)
-
हा फोटो आयपीएस अधिकारी दिपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटवर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत एक महिला कोणत्या कार्यक्रमात असल्याचे दिसत आहे. या महिलेने गळ्यात हार, बिंदी आणि अनेक दागिने घातल्याचे दिसत आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे त्या महिलेने घातलेल्या नथेने वेधले आहे. या महिलेने मास्क घातला असून त्यावर तिने नथनी अडकवली आहे. दिपांशु काब्रा यांनी हा फोटो शेअर करत "दागिन्यांचा जुगाड सुपर अल्ट्रा प्रो मॅक्स", असे कॅप्शन दिले आहे. हे पाहताच नेटकऱ्यांनी यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Photo Credit : Dipanshu Kabra Twitter)
-
एक नेटकरी म्हणाला, "आता फक्त लिपस्टिक दिसण्याचा जुगाड करणं राहिलं आहे."
-
दुसरा नेटकरी म्हणाला, "महिलांमध्ये आश्चर्यात पाडणारे टॅलेंट आहे."
-
तिसरा नेटकरी म्हणाला, "अशा कठीण परिस्थितीत सुद्धा कोणत्या ना कोणत्या प्रकारे लोक संधी मिळवतात."
-
एक नेटकरी म्हणाला, " आता फक्त काकुंनी मास्कला चेहऱ्याच्या रंगाशी मॅच करण राहिल बस."
-
दुसरा नेटकरी म्हणाला, "जुगाड तर आपण भारतीय चांगल्या प्रकारे करतो."
-
तिसरा नेटकरी शिल्पा शेट्टीचा डायलॉग वापर म्हणाला, "त्यांनी सुपर पेक्षा पण जास्त चांगला जुगाड केला आहे."
-
एक नेटकरी म्हणाला, "ती स्त्री आहे, ती काहीही करु शकते."
-
दुसरा नेटकरी म्हणाला, "बिचारा करोना, जेव्हा त्याने हे पाहिलं असेल तेव्हा तो असाच संपून गेला असेल."
-
तिसरा म्हणाला, "अप्रतिम! मेकअप आणि सुरक्षा दोन्ही."
-
एक नेटकरी म्हणाला, "नथ तर खरचं दाखवण्यासारखी आहे."

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…