-
भारतात १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करुन फरार झालेल्या मेहुल चोक्सीला अँटिग्वामध्ये अटक करण्यात आली असून त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. (सर्व फोटो : पीटीआय, एएनआय, रॉयटर्स आणि ट्विटरवरुन साभार)
-
भारतातून फरार झाल्यानंतर २०१८ पासून मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये वास्तव्यास होता. या पार्श्वभूमीवर अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी चोक्सी आपल्या प्रेयसीसोबत असल्याची शक्यता व्यक्त केलेली.
-
मेहुल चोक्सी कदाचित त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर डोमिनिकामध्ये फिरण्यासाठी गेला होता आणि तिथे त्याला अटक करण्यात आल्याचं अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन म्हणाल्याचं अँटिग्वा न्यूज रूमच्या हवाल्याने एएनआयने काही दिवसांपूर्वी वृत्त दिलेलं. यानंतर चोक्सीची गर्लफ्रेण्ड कोण अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र आता त्यासंदर्भात खुलासा समोर आलाय.
-
ब्राउन यांनी चोक्सी गर्लफ्रेण्डसोबत रोमॅन्टीक डिनरला गेला होता. त्याचेवेळी त्याला अटक करण्यात आल्याचं सांगितलं. चोक्सी त्याच्या प्रेयसीसोबत भटकंतीसाठी डोमिनिका बेटांवर गेला होता.
-
अँटिग्वामधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार चौक्सीने वकिलांच्या हवाल्याने केलेल्या दाव्यानुसार तो त्याच्या एका मैत्रिणीला भेटायला गेला होता. त्याचवेळी काही अज्ञात लोकांना चोक्सी यांचं अपहरण केल्याचा दावा वकिलांनी न्यायालयासमोर केला.
-
२३ मे रोजी चोक्सी त्याच्या मैत्रिणीसोबत डिनरसाठी जात होता. त्याचवेळी त्याचं अपहरण करण्यात आल्याचं वकिलांनी म्हटलं आहे.
-
चोक्सी मागील वर्षभरापासून ज्या महिलेच्या संपर्कात होता आणि जिचा दाखला न्यायालयात देण्यात आलाय तिचं नाव बारबरा जार्बिका असं असल्याची माहिती अँटिग्वामधील प्रसारमाध्यमांनी दिलीय.
-
अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनीही चोक्सीचे एका महिलेसोबत संबंध असल्याचा उल्लेख केला होता.
-
भारतामधून एक विशेष विमान डोमिनिकाला पाठवण्यात आलं आहे. या विमानात चोक्सीसंदर्भातील काही महत्वाचे पुरावे आणि न्यायालयीन सुनावणीचे कागदपत्रं असल्याचं सांगण्यात येत आहे. या पुरव्यांच्या आधारेच चोक्सीचा भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
-
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कतार एअरवेजचं विशेष विमान भारत सरकारने भाडेतत्वावर घेतलं आहे. या विमानाचं एका फेरीचं भाडं कोट्यावधी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
-
या विमानासाठी प्रती तास पाच लाख रुपये भाडं मोजण्यात येत असल्याचं वृत्त सुत्रांच्या हवाल्याने देण्यात आलं आहे. डोमिनिका बेटांपर्यंत पोहचण्यासाठी १६ तासांचा वेळ लागतो.
-
म्हणजेच चोक्सीला आणण्यासाठी गेलेल्या विमानाच्या एका फेरीसाठी ८० लाखांचा खर्च आल्याचं सांगण्यात येत आहे. इतर खर्चाचा विचार केला तर एका बाजूच्या उड्डाणाचा खर्च एक कोटींच्या घरात असल्याचं सांगण्यात येतं.
-
हे विशेष विमान कतार एअरवेजच्या विशेष श्रेणीतील विमान आहे. हे ए सेव्ह सीईई प्रकाराचे विमान आहे. हे विमान २८ मे रोजी भारतातून डोमिनिकालाच्या दिशेने झेपावलं.
-
या विमानामधून २८ मे रोजी भारतीय गुप्तचर यंत्रणांचे सहा लोक, दोन कमांडो अशी टीम डोमिनिकाला गेलीय. यामध्ये सीबीआयचे दोन अधिकारी, ईडीचे दोन अधिकारी आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या दोन अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.
-
विमानामध्ये विशेष सुरक्षा पुरवण्यात आलीय. डोमनिकाने चोक्सीचा ताबा दिला तर त्याला परत आणण्यासाठी दोन कमांडोही पाठवण्यात आलेत.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं