-
मुंबईमध्ये मान्सूनचे दमदार आगमन झालं असून सालाबादप्रमाणे यंदाही पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. पहिल्याचा पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसलाय.
-
पहिल्या पावसात ट्रॅकवर पाणी चाचल्याने कुर्ल्यासहीत, सायन रेल्वे स्थानक आणि जीटीबी नगर दरम्यानची वाहतूक ठप्प झालीय.
-
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ट्रॅकवर पाणी साचल्याने कुर्ला ते सीएसटीदरम्यानची वाहतूक थांबवण्यात आलीय.
-
ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे.
-
मात्र या पावसामुळे उडालेल्या गोंधळात कुर्ल्याची भारतभरात चर्चा असल्याचं चित्र ट्विटरवर दिसत आहे. Kurla हा शब्द ट्विटरवर ११ व्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसत आहे.
-
अनेकांनी मिम्स शेअर केलेत. थोडा पाऊस पडला तरी ट्रॅक काय म्हणत असतील सांगणारं मीम पाहा.
-
हे मीम कुर्ल्यातील लोकांची परिस्थिती अशा नावाने व्हायरल झालंय.
-
थोड्या पावसानंतर कुर्ला आणि सायन स्थानकाची परिस्थिती अशी होते म्हणे
-
कुर्ल्यासोबतच #MumaiRains हा हॅशटॅग चर्चेत असून यावरुनही अनेकांनी मिम्स शेअर केलेत.
-
पाऊस पडल्यावर मुंबईकरांचा पहिला प्रश्न हाच असतो असं या व्यक्तीचं म्हणणं आहे.
-
पाऊस पडल्यावर स्टेटस टाकणाऱ्यांना टोमणा लगावणारं हे मीम पाहा…
-
सालाबादप्रमाणे अनेकांमधील लेखक पावसातच जागा होतो.
-
तर अनेकांसाठी पाऊस म्हणजे झोपा काढण्याचा काळ असतो.
-
दादर स्थानक शोधताना प्रवासी…
-
मोदींचा हा फोटो पावसाचा फायदा होईल सांगणारा आहे.
-
अनेकांनी हा पहिलाच पाऊस म्हणजे हल्ला वाटतोय असं मत व्यक्त केलंय.

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का