-
राज ठाकरे यांचा आज ५३ वा वाढदिवस. राज हे त्यांच्या भाषण शैलीसोबतच आणि राजकारणाबरोबर व्यंगचित्रांसाठीही ओळखले जातात. राज हे सोशल नेटवर्किंगवर अॅक्टीव्ह झाल्यापासून अनेकदा व्यंगचित्रांच्या माध्यमातून विरोधकांवर टिका करताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासारख्या विषयांवर राज यांनी आतापर्यंत बरीच व्यंगचित्र काढली आहे. भाजपा, शिवसेना यांच्यावर तर राज यांनी अनेकदा टिका केली आहे. (सर्व फोटो राज ठाकरेंच्या फेसबुक पेजवरुन साभार)
-
२०१८ साली दिवाळीमध्ये पाच दिवसांत पाच व्यंगचित्रांमधून राज यांनी राज्यातील युती सरकारवर टिका केली होती. त्यानंतरही अनेकदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. चला तर मग त्यांच्या ५३ व्या वाढदिवसानमित्त पाहूयात राज यांनी आतापर्यंत कधी कधी आणि कोणकोणती व्यंगचित्रे काढत सत्ताधाऱ्यांना फटकारे लगावलेत.
-
३१ मार्च २०१८ रोजी दिल्लीत ड्रेसिंग रुममधील चर्चा नावाने काढलेलं व्यंगचित्र.
-
लोकशाही नावाने राज यांनी हे व्यंगचित्र शेअर केलं होतं. (३१ ऑक्टोबर २०१७)
-
दिल्ली निवडणुकानंतर राज ठाकरेंनी काढलेलं व्यंगचित्र.
-
उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर राज यांनी व्यंगचित्रातून केलेलं भाष्य (३ डिसेंबर २०१७)
-
२६ जानेवारी २०१९ रोजी राज ठाकरेंनी काढलेले व्यंगचित्र…
-
लोकमान्य टिळक आणि गोपाळ आगरकरांचा संदर्भ देत केलेलं भाष्य (२१ जानेवारी २०१९)
-
काँग्रेसने मला छळले या मोदींच्या टीकेवरुन फटकारे (१९ जानेवारी २०१९)
-
२०१८ चं हे व्यंगचित्र आजही लागू पडतं नाही का? हे व्यंगचित्र इंधनाचा भडका अन् मोदी सरकार या विषयावर आधारित आहे. (३ जून २०१८)
-
संक्रांत विशेष पतंगबाजी (१५ जानेवारी २०१९)
-
सीबीआय विरुद्ध सीबीआय प्रकरणावरुन (१२ जानेवारी २०१९)
-
सीबीआय संचालकपदावरुन मोदींवर टिका… (८ जानेवारी २०१९)
-
नव्या वर्षाचा पहिलाच फटकारा… (१ जानेवारी २०१९)
-
रामदेव बाबांच्या त्या वक्तव्यावरुन… (२८ डिसेंबर २०१८)
-
चिंतन (१२ डिसेंबर २०१८)
-
एक मनमोकळी मुलाखत म्हणज २०१८ साली राज यांनी मोदी स्वत:शीच गप्पा मारताना काढलेलं हे व्यंगचित्र.
-
मध्य प्रदेश, राजस्थान निवडणुकांच्या निकालानंतर (११ डिसेंबर २०१८)
-
राम मंदिरावरील राजकारणावरुन… (२५ नोव्हेंबर २०१८)
-
साखर कारखान्यांच्या विषयावरुन कडवट टिका (१८ नोव्हेंबर २०१८)
-
अवनी वाघीण प्रकरणावरुन युती सरकारला टोला (१३ नोव्हेंबर २०१८)
-
मुंबईचे महापौर राणीच्या बागेत (९ नोव्हेंबर २०१८)
-
यंदा भाऊबीज नाही… (९ नोव्हेंबर २०१८)
-
२०१८ साली पाडवा विशेष म्हणून काढलेलं हे व्यंगचित्र (८ नोव्हेंबर २०१८)
-
लक्ष्मीपूजन (७ नोव्हेंबर २०१८)
-
८ ऑक्टोबर २०१७ साली सोशल नेटवर्किंगचा परतीचा पाऊस भाजपाला जड झाल्याचं भाष्य करणारं हे व्यंगचित्र.
-
अभ्यंगस्थान (६ नोव्हेंबर २०१८)
-
नरकचतुर्थी (६ नोव्हेंबर २०१८)
-
२०१८ साली धनत्रयोदशीनिमित्त रेखाटलेलं हे व्यंगचित्र. (५ नोव्हेंबर २०१८)
-
स्टॅच्यू ऑफ युनिटी या विषयावर आधारित व्यंगचित्र (३० ऑक्टोबर २०१८)
-
राफेल प्रकरणावरुन राज यांनी कुंचल्यांमधून डागली तोफ (२७ ऑक्टोबर २०१८)
-
जलयुक्त शिवारवरुन टोला (१५ ऑक्टोबर २०१८)
-
दुष्काळावरुन फडणवीसांना टोला. (९ ऑक्टोबर २०१८)
-
गांधी जयंतीनिमित्त २०१८ साली राज यांनी रेखाटलेलं हे व्यंगचित्र. (२ ऑक्टोबर २०१८)
-
सेना भाजपा युतीवर मन की बात नावाने राज यांनी शेअर केलेलं हे व्यंगचित्र पाठीत खंजीर खुपसला या शब्दांना चित्ररुप देणारं आहे. (८ जून २०१८)
-
मोदी आणि शाह यांचा उल्लेख या व्यंगचित्रामध्ये वर्गाबाहेरचे असा करण्यात आलाय. (१९ सप्टेंबर २०१८)
-
प्रिसिद्धी विनायक नावाने मोदींना लगावलेला टोला. (१७ सप्टेंबर २०१८)
-
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली (१८ ऑगस्ट २०१८)
-
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली (१७ ऑगस्ट २०१८)
-
आणीबाणीवर बोलणाऱ्या मोदींना टोला (२६ जून २०१८)
-
जातीपातीच्या राजकारणावरुन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्यंगचित्रातून लगावलेला टोला. (१९ जून २०१८)
-
संभाजी भिडेंवर व्यंगचित्रामधून केलेली टिका (१३ जून २०१८)
-
हा राज यांचा आणखीन एक टोला, कुंचल्यांमधून. व्यंगचित्राचं नाव आहे, स्टार प्रचारकांची बकेट लिस्ट (६ जून २०१८)
-
२०१८ च्या कर्नाटक निवडणुकीनंतर राज यांच्या कुंचल्यातून उमटलेले फटकारे (२२ मे २०१८)
-
कमल हसन यांचा राजकारणात प्रवेश या विषयावरील राज यांनी रेखाटलेलं व्यंगचित्र (३ मार्च २०१८)
-
श्रेयासाठी रस्सीखेच नावाने शेअर केलेलं व्यंगचित्र (१२ फेब्रुवारी २०१८)
-
शिवसेना आणि भाजपाची युतीवर राज यांचं ‘मार्मिक’ भाष्य (२४ जानेवारी २०१८)
-
हज सबसिडी विषयावर राज यांनी रेखाटलेलं व्यंगचित्र (१९ जानेवारी २०१८)
-
मोदींवर असत्याचे प्रयोग म्हणत केलेली टीका.
-
२३ जानेवारी २०१८ रोजी गुजरात निवडणुकांच्या निकालानंतर राज ठाकरेंनी रेखटलेलं हे व्यंगचित्र
-
२३ सप्टेंबर २०१७ रोजी दाऊद विषयावरुन मोदी, भाजपाला लगावलेला टोला.
-
२०१६ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राज यांनी रेखाटलेलं हे व्यंगचित्र
-
इंधन दरवाढ विषयावरील हे व्यंगचित्र राज ठाकरेंनीच रेखाटलं आहे.
-
१८ फेब्रुवारी २०१८ रोजी राज ठाकरेंनी पोस्ट केलेलं हे व्यंगचित्र म्हणजे भारतामधून बँक घोटाळे करुन पळून जाणाऱ्यांकडे केंद्राने डोळाझाक केल्याचं सांगत काढलेला चिमटा आहे.
-
फडणवीस यांना लगावलेला टोला
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO