-
लोकप्रिय यूट्यूबर, गायक आणि डिजीटल कंटेंट क्रिएटर्सपैकी भारतामधील आघाडीचं नाव असणाऱ्या भुवन बामच्या आई-वडिलांचा करोनामुळे मृत्यू झालाय. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)
-
भुवन बामने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत शनि्वारी सायंकाळी आपल्या पालकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती दिली.
-
भुवन बामने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या पालकांसोबतचे जुने फोटो शेअर करत मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिलीय. ”कोविडमुळे मी माझ्या पालकांना गमावले आहे. आई आणि बाबांशिवाय काहीही आधीसारखे राहिलेले नाही," असं भुवनने या पोस्टमध्ये म्हटलंय.
-
"आई-बाबांच्या जाण्याने एका महिन्यात सर्व उद्ध्वस्त झालं आहे. घर, स्वप्ने, सर्व काही. माझी आई माझ्याजवळ नाही, माझे बाबा माझ्याजवळ नाहीत. आता मला सुरुवातीपासूनच जगायला शिकावे लागेल. पण तसे करावेसे वाटत नाही,” असंही भुवन पोस्टमध्ये म्हणालाय.
-
”मी खरंच चांगला मुलगा आहे का? मी त्यांना वाचवण्यासाठी सर्व काही केले का? मला आता या प्रश्नांसह कायमचे जगावे लागेल. मी त्यांना पुन्हा पाहण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. मी प्रार्थना करतो, की तो दिवस लवकरच येईल”, असेही भुवन बाम पोस्टमध्ये म्हटले आहे.
-
२०२० मध्ये भुवन बामलाही करोनाची लागणही झाली होती. सोशल मीडियावर त्याने याबाबत सांगितले होते.
-
दिवाळीच्या आसपास भुवनला करोनाची लागण झाली होती तेव्हा त्याने लक्ष्मीपुजनाच्या दिवशीचे काही फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केलेले. या फोटोंमध्ये भुवनचे आई-बाबा देवाची पुजा करताना दिसतायत आणि तो क्वारंटाइन असणाऱ्या रुममधूनच दूरुन दर्शन घेताना दिसतोय.
-
भुवनचा जन्म तसा बडोद्यामधलाच. त्याची ओळख आजही गुजरातमध्ये जन्मलेला महाराष्ट्रीयन जो नंतर दिल्लीत रहायला गेला, अशी सांगितली जाते.
-
भुवनचे बीबी की वाईन्स हे युट्यूब चॅनेल ठाऊक नसणारा तरुण वर्ग सापडणे मुश्कील इतकी त्याची लोकप्रियता आहे. दिल्लीमध्ये राहणारा भुवन अनेकदा त्याच्या आईसंदर्भातील पोस्ट इन्स्ताग्रामवरुन पोस्ट करायचा.
-
भुवनच्या आईचं नाव पदमा होतं. त्या मराठी कुटुंबातील होत्या.
-
भुवनची आई बडोद्यातील मराठी कुटुंबातील असल्याने त्या खूप छान मराठी बोलायच्या.
-
आईमुळेच मलाही बऱ्यापैकी मराठी जमते असे भुवनने २०१७ साली युट्यूब फॅनफेस्टनिमित्त मुंबईत दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
-
घरीसुद्धा आई वरचेवर मराठी वापरत असल्याने घरात मराठमोळे वातावरण आहे. त्यामुळे माझ्यावर मराठीचे संस्कार असल्याचे भुवनने सांगितलं होतं.
-
आई मराठी असल्याने आणि लहानपणापासूनच मराठीचे थोडेफार संस्कार झाल्याने भुवन अनेकदा मराठमोळी वाक्ये आपल्या व्हिडीओमध्ये सहज वापरताना दिसतो. तो ही वाक्य इतक्या मस्त पद्धतीने वापरतो की भुवन पक्का मराठी आहे असा लोकांचा समज होतो.
-
आई मराठी असल्याने आणि लहानपणापासूनच मराठीचे थोडेफार संस्कार झाल्याने भुवन अनेकदा मराठमोळी वाक्ये आपल्या व्हिडीओमध्ये सहज वापरताना दिसतो. तो ही वाक्य इतक्या मस्त पद्धतीने वापरतो की भुवन पक्का मराठी आहे असा लोकांचा समज होतो.
-
भुवन त्याच्या आईसोबतचे फोटोच नाही तर डान्स करतानाचे व्हिडीओही शेअर करायचा.
-
भुवनच्या वडिलांचं नाव अवनिंद्र असं होतं.
-
भुवन अनेकदा त्याच्या पालकांबद्दलच्या पोस्ट इन्स्टाग्रामवरुन शेअर करायचा. हा फोटो त्याने एका पुरस्कार सोहळ्यामध्ये पुरस्कार मिळाल्यानंतर पोस्ट केलेला.
-
केवळ पुरस्कार सोहळाच नाही तर घरगुती फोटोही भुवन आपल्या लाखो चाहत्यांसोबत शेअर करायचा. घरापासून दूर असताना आई-वडील घरी कशापद्धतीने आंब्यांची माज घेत आहेत हे सांगणार हा फोटो भुवनने शेअर केला होता. त्यावेळेस त्याने हा फोटो मला आईने पाठवल्याचं सांगितलं होतं.
-
भुवनने बीबी की वाईन्सच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी तर मिळवलीच शिवाय त्याचं करीयरही सेट झालं. मनोरंजन क्षेत्रात जरा जम बसल्यानंतर त्याने २०१८ साली नवं घरं घेतलं. तेव्हा सुद्धा त्याने कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले होते. (१८ डिसेंबर २०१८ रोजी भुवनने पोसट केलेला फोटो)
-
भुवनला एक छोटा भाऊ आहे. (१८ डिसेंबर २०१८ रोजी नवीन घर घेतल्यानंतर भुवनने पोसट केलेल्या फोटोंपैकी हा एक फोटो)
-
भुवनने आपल्या बाबांसोबतचा लहानपणीचा फोटो २०१८ साली होळीनिमित्त शेअर केलेला. तेव्हा पण मला रंगांची भीती वाटायची आताही वाटते, असं भुवनने म्हटलं होतं. (२ मार्च २०१८ रोजी पोस्ट केलेला फोटो)
-
भुवनला त्याच्या आई वडिलांकडून काही कॅरेक्टरचीही प्रेरणा मिळाल्याचं या फोटोतून दिसून येतं. भुवनने त्याचं बिट्टू मामा हे लोकप्रिय कॅरेक्टर बाबांचा जुना फोटो पाहून सुचल्याचं म्हटलं होतं.
-
२० एप्रिल २०१९ रोजी भुवनने त्याला पुस्कार मिळाला तो क्षण आई-बाबा टीव्हीवर पाहत असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता.
-
८ जानेवारी २०२० रोजी भुवनने आईच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केलेला हा फोटो. भुवन अनेकदा आपल्या आईचे फोटो पोस्ट करताना तिला उल्लेख 'जिंदगी' असा करायचा.
-
२०१९ रोजी आईच्या वाढदिवसानिमित्त भुवनने, "आज जिंदगीचा बर्थ डे है", म्हणत हा फोटो पोस्ट केलेला.
-
आईच्या वाढदिवसानिमित्त लहानपणीच्या फोटोप्रमाणे फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याचंही भुवनने हा फोटो पोस्ट करत म्हटलं होतं.
-
१९ ऑक्टोबर २०१७ रोजी पहिल्यांदाच दिवाळी पालकांसोबत साजरी करता आली नाही म्हणून भुवनने केलेली ही पोस्ट.
-
एका थर्टी फर्स्टला भुवनने मुद्दाम घरात आई-बाबांसोबत नवीन वर्षाचं स्वागत करण्याचं ठरवलं होतं, तेव्हाचा हा फोटो.
-
भुवनच्या आईने एकाच कंपनीमध्ये रिसेप्शनिस्ट ते एक्झिक्युटीव्ह अॅडमीन असा प्रवास केल्याबद्दल तिचा सत्कार झाला होता, त्यावेळी भुवनने पोस्ट केलेला हा फोटो. आईमधील पाच टक्के डेडिकेशन जरी माझ्यात असतं तर लाईफ सेट असती असं म्हटलं होतं.
-
माझा चंद्र आणि सूर्यही तूच, असं म्हणत भुवनने पोस्ट केलेला हा आईचा फोटो.
-
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर महिला असं म्हणत भुवनने ३० सप्टेंबर २०१७ रोजी पोस्ट केलेला हा त्याच्या आईचा फोटो.
-
भुवनने एकदा आईचा वाढदिवस तिच्यासोबत नाचत साजरा केलेला. या डान्सचा व्हिडीओ त्याने शेअर केलेला.
-
भुवनने आईसोबत डान्स करतानाचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत होते.
-
युट्यूब फॅनफेस्टनिमित्त मुंबईत लागलेल्या होर्डिंगवर आपला फोटो असल्याचं सांगतनाही भुवनला आईची आठवण झालेली. (फोटो १७ मार्च २०१७ रोजी पोस्ट केलाय.)
-
भुवनच्या आई-बाबांनी पहिल्यांदा भुवनचे व्हिडीओ पाहिले तेव्हा पोस्ट केलेला फोटो. (१६ जून २०१६)
-
भुवनच्या वडिलांवर मध्यंतरी एक शस्त्रक्रीया झाली होती तेव्हा त्याने पोस्ट केलेला हा फोटो.
-
वाढदिवसानिमित्त भुवनच्या आईने त्याचं औक्षण केलं होतं.
-
द वीक मॅग्झीनमध्ये भुवनसंदर्भात आलेला लेख त्याच्या वडिलांनी वाचतानाचा फोटो त्याला त्याच्या आईने पावला होता.
-
आजच्या घडीला भुवन हा भारतातील आघाडीच्या युट्युबर्सपैकी एक आहे. विशेष म्हणजे सोलो युट्यूब क्रिएटर्समध्ये भुवन इतर भारतीय युट्युबर्सपेक्षा खूप पुढे आहे.
-
भुवन यशाच्या शिखरावर असतानाच त्याच्या पालकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने त्याला मोठा धक्का बसलाय. त्यामुळेच त्याने आई-वडिलांच्या निधनाची पोस्ट केल्यानंतर, आपल्याला हसवणाऱ्या भुवनला आज दुखाच्या प्रसंगी आपल्या आधाराची गरज आहे, असं सांगणाऱ्या तसेच भुवनच्या पालकांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. ही फोटोमधील पोस्ट भुवनच्या एका जवळच्या मित्राने लिहिलेली आहे.

Pakistan PM Shahbaj Sharif : “पहलगाम हल्ल्याप्रकरणी आम्ही तटस्थ चौकशीला तयार”; पाकिस्तानच्या पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया!