-
भारतीय उद्योगाचे पितामह जमशेदजी टाटा हे जगातले आता पर्यंतचे सर्वात मोठे दानशूर ठरले आहेत. 'एडेलगीव्ह हरुन फाऊंडेशन'नं जगातल्या ५० सर्वात मोठ्या दानशुरांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये जमशेदजी अव्वल स्थानी आहेत. तर चला जाणून घेऊया या लिस्टमध्ये कोणा कोणाची नावं आहेत आणि त्यांनी एकूण किती रक्कम दान केली आहे…
-
पाचव्या क्रमांकावर वॉरन बफे आहेत. त्यांनी ३७. ४ अब्ज डॉलर्स दान केले आहेत. (Photo Credit : Indiab Express)
-
चौथ्या क्रमांकावर हॉवर्ड ह्यूजेस आहेत. त्यांनी ३८.६ अब्ज डॉलर्स दान केले आहेत. (Photo Credit : Wikipedia)
-
तिसऱ्या क्रमांकावर हेन्री वेलकम आहेत. हॅन्री यांनी ५६.७ अब्ज डॉलर्स दिले आहेत. त्यांनी प्रामुख्याने आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित केले. (Photo Credit : Wikipedia)
हेन्री यांनी १८८० मध्ये त्याच्या सहकारी सिलास बुरोस यांच्याबरोबर बुरोस वेलकम अँड कंपनी या औषधी कंपनीची स्थापना केली. (Photo Credit : Wikipedia) -
दुसऱ्या स्थानावर बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स आहेत. त्यांनीही आतापर्यंत ७४.६ अब्ज डॉलर्स दान केले आहेत. (Photo Credit : Indian Express)
-
बिल गेट्स आणि मिलिंडा यांनी २०००मध्ये आपला प्रवास सुरू केला. त्यांनी प्रामुख्याने आरोग्यसेवेशी संबंधित गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. (Photo Credit : Indian Express)
-
या यादीमध्ये जमशेदजी पहिल्या स्थानी आहेत. (Photo Credit : Indian Express)
-
स्वतः जमशेदजी आणि त्यांनी स्थापन केलेल्या टाटा समूहानं आतापर्यंत तब्बल १०२ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे दान केले आहे. (Photo Credit : Indian Express)
-
त्यांनी त्यांचा प्रवास हा १८९२ मध्ये सुरु केला होता. जमशेदजींनी आपली दोन तृतियांश संपत्ती सामाजिक कार्यासाठी खर्च केली आहे. (Photo Credit : Indian Express)
-
जगभरातील दानशुरांच्या यादीत दुसरे भारतीय आहेत अझिम प्रेमजी.. त्यांनी आपली तब्बल २२ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान केली आहे. (Photo Credit : Indian Express)
-
या दोन भारतीयांव्यतिरिक्त दानशुरांच्या यादीत ३९ अमेरिकन, ५ ब्रिटिश, ३ चिनी व्यक्तींचा समावेश आहे. या ५० जणांनी मिळून गेल्या शंभर वर्षात ८३२ अब्ज डॉलर्स दान केले आहेत. यात ५०३ अब्ज संस्थात्मक आणि ३२९ वैयक्तिक दान आहे. (Photo Credit : Indian Express)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…