-
दरवर्षी मे महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पडघम जगभर एप्रिलपासूनच वाजायला सुरूवात होते. जगभरातील दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांसमोर आणणारा हा महोत्सव वेगवेगळ्या कारणाने कायम चर्चेत असतो. यंदा तो चर्चेत आला आहे बेला हदीदमुळे.
-
अमेरिकन मॉडल असणाऱ्य बेला हदीदचा कान चित्रपट महोत्सवातील बोल्ड आणि ब्युटीफूल लूक सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
-
झालं असं की, कान महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बेलाने रेड कार्पेटवर हजेरी लावली.
-
बेला हदीद अगदीच हटके पद्धतीने चाहत्यांसमोर आली.
-
कान महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रेड कार्पेटवर आलेल्या बेलाने शियापरेली ब्लॅक ड्रेस परिधान होता.
-
बेलाने परिधान केलेल्या ड्रेसबरोबरच तिने गळात घातलेला नेकलेसही चांगलाच चर्चेत आला.
-
काळ्या रंगाच्या ड्रेसवर बेलाने सोन्याचा एकदम हटके नेकलेस घातलेला.
-
कोणाचीही नजर वेधून घेण्यासाठी आणि काही क्षण ती खिळवून ठेवण्यासाठी बेलाचा हा बोल्ड लूक पुरेसा आहे, असं बेलाचे अनेक चाहते फोटो व्हायरल झाल्यावर म्हणत होते.
-
बेलाने घातलेला हा नेकसेल फुफ्फुसांच्या आकाराचा होता.
-
बेलाच्या अनेक चाहत्यांनी या नेकलेसला लंग्स नेकलेस असं म्हटलं आहे.
-
या नेकलेसची रचनाही खास असल्याचं पाहता क्षणी लक्षात येतं. त्यात तो काळ्या रंगाच्या ड्रेसवर अजून छान दिसत होता.
-
बेलाचा हा हटके लूक इंटरनेटवर तुफान व्हायरल झालाय.
-
सोशल नेटवर्किंगवर बेलाच्या या फोटोंवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असल्याचं चित्र दिसत आहे.
-
बेला हदीद हे नाव अमेरिकन फॅशन इंडस्ट्रीमधील फार मोठं नाव आहे.
-
बेला तिच्या रिस्की आणि बोल्ड कपड्यांसाठी फॅशन इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाते.
-
आपली ही ओळख बेलाने २०२१ च्या कान महोत्सवामध्ये लंग्स नेकलेस आणि ब्लॅक शियापरेली ड्रेसच्या माध्यमातून जपली.
-
कानच्या रेड कार्पेटवर येण्याआधीच बेलाने आपल्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन काही फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केले होते.
-
बेलाला ड्रेस आणि कॉम्बिनेशन इतकं आवडलं की तिनेच स्वत:चं कौतुक करत हे फोटो शेअर केलेले.
-
'अ क्लासिक' अशी कॅप्शन बेलाने फोटो पोस्ट करताना दिलेली.
-
काहींनी बेलाच्या या लंग्स नेकलेसवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
अनेकांनी केलेलं कौतुक आणि काहींनी केलेलं ट्रोलिंग लक्षात घेतल्यास काही मिनिटांसाठी रेड कार्पेटवर आलेली बेला या लंग्स नेकलेसमुळे भाव खावून गेली असंच म्हणावं लागेल. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

“त्याने मला ओळखही दिली नाही”, कपिल शर्माच्या वागणूकीवर ज्येष्ठ अभिनेत्याची नाराजी; म्हणाले, “संपूर्ण देश माझ्या पाया…”