-
जर्मनीची राजधानी असणाऱ्या बर्लिनमध्ये शनिवारी एक आगळं वेगळं आंदोलन झालं. या आंदोलनाचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. हे आंदोलन सुरु असताना पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हे आंदोलन चर्चेत असणाऱ्याचं कारण असं होतं की या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला टॉपलेस होत्या तर पुरुषांनी ब्रा आणि बिकीनी परिधान करुन आंदोलनात सहभाग घेतला होता. (सर्व फोटो : एपी आणि रॉयटर्सवरुन साभार)
-
लैंगिक समानतेच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. बरं अचानक हे आंदोलन करण्यामागील कारण असं होतं की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येथील एका वॉटरपार्कमध्ये एक महिला टॉपलेस होऊन सनबाथ घेताना तिच्यावर कारवाई करण्यात आलेली. सुरक्षा रक्षकांनी या महिलेला वॉटर पार्कमधून बाहेर काढलं होतं. याच घटनेचा निषेध करण्यासाठी हे आगळंवेगळं आंदोलन करण्यात आलं.
-
वॉटरपार्कमध्ये टॉपलेस होऊन सनबाथ घेणाऱ्या महिलेविरोधात सुरक्षा रक्षकांनी कारवाई केल्याने अनेक महिलांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या माहिलांनी आपल्या शरीरावर 'माय बॉडी, माय चॉइस', म्हणजेच माझं शरीर, माझा अधिकार किंवा मी तुमची पॉर्न नाहीय, तुमच्या डोळ्यांमध्ये पाप आहे, अशा अर्थाच्या घोषणा लिहिल्या होत्या.
-
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार मूळची फ्रान्समधील असणारी ही महिला तिची दोन मुलं आणि एका मित्रासहीत वॉटर पार्कमध्ये गेली होती. तिने स्वीमिंग सूट परिधान केलेले. मात्र त्यानंतर ती टॉपलेस होऊन सनबाथ घेऊ लागली असता तिला आधी सुरक्षा रक्षकांनी हटकलं.
-
पार्कमधील सुरक्षा रक्षकांनी तिला आधी छाती झाकून घेण्यास सांगितलं. त्यावर तिने नकार देत उलट प्रश्न विचारला. येथे पुरुषांना टॉपलेस होऊन फिरण्यास परवानगी आहे तर मी का नाही असं करु शकतं?, असं तिने सुरक्षा रक्षकांना विचारलं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तिला पार्कमधून वाद घालून बाहेर काढलं होतं. याच विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं.
-
या महिलेला वॉटरपार्कमधून बाहेर काढण्यात आल्याच्या घटनेविरोधात केलेल्या या आंदोलनामध्ये पुरुषांनी ब्रा घालून सहभाग नोंदवला. तर महिला 'फ्री द बूब्स' म्हणत टॉपलेस होऊन या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या.
![Ravi Shastri Said India Chances To Win Champions Trophy 2025 Will Be Decreased 30 Percent If Jasprit Bumrah Will Not Play](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-63.jpg?w=300&h=200&crop=1)
Champions Trophy 2025 : ‘हा’ खेळाडू नसेल तर भारताची जेतेपद पटकावण्याची शक्यता ३० टक्क्याने घटली; रवी शास्त्रींचं भाकीत