-
देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी असणाऱ्या टाटा मोटर्सने गुरुवारी आपली एक्सप्रेस (XPRES) हा नवा इलेक्ट्रीक व्हेइकलचा ब्रॅण्ड लॉन्च केलाय.
-
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एक्सप्रेस ब्रॅण्ड अंतर्गत सर्वात आधी इलेक्ट्रीक सेडान कार लॉन्च करण्यात येणार आहे. ही गाडी कंपनीच्या टीगोर या जुन्या सडान ब्रॅण्डचं रिब्रॅण्डेड व्हर्जन आहे.
-
फ्लीट सेगमेंटमधील या ब्रॅण्डची पहिलीच गाडी फारच उत्तम पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे. एक्सप्रेस टी नावाने ही गाडी ओळखली जाणार आहे. ही गाडी कॉर्परेट आणि सरकारी खात्यांसाठी फार फायद्याची ठरेल असा कंपनीचा अंदाज आहे.
-
एक्सप्रेस टीमुळे इंधनावर चालणाऱ्या गाड्यांपेक्षा वीजेवर चालणाऱ्या गाड्यांना प्रोत्साहन देण्याचंही काम करता येईल.
-
एक्सप्रेस ब्रॅण्ड अंतर्गत लॉन्च करण्यात येणाऱ्या पहिल्या गाडीचं नाव हे एक्सप्रेस टी ठेवण्यात आलं आहे. लोकांची ने-आण करण्यासाठी म्हणजेच पिकअप आणि ड्रॉप, टॅक्सी यासारख्या वापरांसाठी म्हणजेच खास करुन फ्लीट सेगमेंटमध्ये या गाड्यांना प्रोत्साहन देण्याची कंपनीची योजना आहे.
-
मोठ्या क्षमतेची बॅटरी आणि फास्ट चार्जिंगसारख्या सुविधा या गाडीत देण्यात आल्याने ती जास्त सहजतेने वापरता येणार आहे. (प्रातिनिधिक फोटो, रॉयटर्सवरुन साभार)
-
टाटाच्या पॅसेंजर व्हेइकल बिझनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी, "मला हा कंपनीचा नवीन ब्रॅण्ड लॉन्च करताना फारच आनंद होत आहे. ही गाडी फ्लीट ग्राहकांबरोबरच सरकारी, कॉर्परेट आणि मोबॅलिटी सर्व्हिसेस देणाऱ्या कंपन्याच्या गरजा पूर्ण करणारी असेल. हे गाडी स्मार्ट आणि भविष्याच्या दृष्टीने बनवण्यात आलीय," असं सांगितलं.
-
एक्सप्रेस-टी इलेक्ट्रीक सेडान गाडी ही देशातील मोजक्याच डिलर्सकडे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कंपनी ही गाडी दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या ड्रायव्हिंग रेजंच्या पर्यायासहीत उपलब्ध करुन देणार आहे. मात्र ही सामान्यांच्या विक्रीसाठी उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येत आहे.
-
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या गाडीचे हायर व्हर्जन हे एखदा चार्च केल्यानंतर २१३ किलोमीटर आणि लोअर व्हर्जन एका चार्जिंगमध्ये १६५ किलोमीटरपर्यंतचं अंतर कापू शकते. चाचण्यानंतरच कंपनीने ही आकडेवारी जाहीर केलीय.
-
कंपनी या सेडान कारमध्ये २१.५ केडब्लूएच आणि १६.५ केडब्लूएच क्षमतेच्या बॅटरीचा वापर केलाय. यामध्ये फास्ट चार्जिंग सिस्टीमही देण्यात आली आहे.
-
२१.५ केडब्लूएच क्षमतेची बॅटरी ९० मिनिटांमध्ये तर १६.५ केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी ११० मिनिटांमध्ये ०-८० टक्के चार्ज होऊ शकते. घरात वापरण्यात येणाऱ्या १५ ए पॉवर सॉकेटच्या मदतीने गाडी चार्ज करता येणार आहे. गाडीचे एक्स एम प्लस व्हर्जन हे ९.७५ लाखांना तर एक्स झेड प्लस व्हर्ज ९.९० लाखांना उपलब्ध आहे. (गाडीचे सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”