-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी लस घेताच आपण करोनाविरोधातल्या लढाईत बाहुबली बनतो, असं वक्तव्य केलं.
-
नेटकऱ्यांनी या बाहुबलीचा संदर्भ बाहुबली चित्रपटाशी जोडला आहे. बाहुबली या चित्रपटाचे बाहुबली- द बिगिनिंग आणि बाहुबली द कन्क्लुजन असे दोन भाग प्रदर्शित झाले होते.
-
नेटकऱ्यांनी आता भन्नाट मीम्स शेअर केले आहेत. #Bahubali हा हॅशटॅगही सध्या ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे.
-
पंतप्रधान म्हणाले होते, लस ही हातावर(बाहू) देण्यात येते आणि जेव्हा लस हातावर देण्यात येते तेव्हा तुम्ही बाहुबली बनता.
-
करोनाविरुद्धच्या लढाईत जर तुम्हाला बाहुबली बनायचे असेल तर तुम्हाला हातावर लस घ्यावी लागेल. आता पर्यंत ४० कोटी पेक्षा जास्त लोकं करोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत, असंही पंतप्रधान म्हणाले आहेत.
-
तर एका युजरने बाहुबली या चित्रपटाच्या क्लायमॅक्सचा एक सीन शेअर केला आहे आणि त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य असलेली बातमीही शेअर केली आहे.
-
नेटकरी सध्या पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरुन एकमेकांना विचारत आहेत की तुम्ही बाहुबली झालात का? मी उद्या बाहुबली व्हायला जाणार आहे. (सर्व फोटो सौजन्यः ट्विटर)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”