-
हेमांगीची चर्चा इतकी आहे की मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील करोना परिस्थितीपेक्षा हेमांगी कवीबद्दल गुगलवर अधिक चर्च झालं आहे. याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे पॅन इंडिया गुगल सर्चच्या ट्रेण्डमध्ये ही पोस्ट केल्यानंतर काही दिवस ब्रा (Bra) या सर्च टर्मच्या रिलेटेट टर्ममध्ये हेमांगीचे नाव आघाडीवर असल्याचं दिसलं. म्हणजेच मागील आठवड्यामध्ये ब्रा असं गुगलवर सर्च करणाऱ्यांनी या सर्चचा संबंध थेट हेमांगीचा संदर्भ देऊन करण्यात वाढ झालीय. ही वाढ थोडी थोडकी नसून तब्बल एक हजार टक्क्यांहून अधिक आहे.
-
हेमांगीच्या याच पोस्टमुळे महिलांनी ब्रा घालावी की नाही यावरुनही बरीच चर्चा रंगल्याचं चित्र दिसून आलं. मात्र 'ब्रा'ची साईज या विषयावरुनच एक लग्न हॉलवरच तुटलं असं तुम्हाला सांगितलं तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. काही महिन्यांपूर्वी चीनच्या वायव्येमधील गुइझाउ प्रांतामध्ये घडली होती. जाणून घेऊयात नक्की काय झालेलं…
-
चीनच्या वायव्येमधील गुइझाउ प्रांतामध्ये घटस्फोटाचे एक विचित्र प्रकरण या वर्षाच्या सुरुवातीला समोर आलं होतं. एका नवविवाहित महिलेने लग्नाच्या हॉलवरच घटस्फोटाची मागणी केली.
-
ब्राची साईज पाहून संतापलेल्या या महिलेने गिफ्ट पाहिल्यानंतर राग अनावर झाल्याने लग्नसमारंभामध्येच मोठा गोंधळ घातला होता.
-
पतीने आपल्याला भेट म्हणून दोन साइट छोट्या आकाराची ब्रा गिफ्ट केल्याने आपल्याला घटस्फोट हवा असल्याचं या महिलेचं म्हणणं होतं.
-
या महिलेने सामुहिक जेवणाच्या हॉलमधील विजपुरवठा खंडित केला होता. या महिलेने मला तातडीने घटस्फोट हवा असल्याची मागणी लग्न आयोजित करण्यात आलेल्या हॉमध्येच केल्याचे साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटलं.
-
खरं तर या जोडप्याचं लग्न काही काळापूर्वीच पार पडलं होतं. मात्र करोनामुळे अगदी साध्या पद्धतीने लग्न झाल्यामुळे आपल्या जवळच्या कुटुंबियांबरोबरच मित्रपरीवाराच्या उपस्थितीत लग्न करावे या इच्छेने या दोघांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.
-
लग्न झाल्यापासून दोघेही आनंदाने संसार करत होते. मुलाचे अडनाव यांग तर मुलीचे अडनाव लुओ असल्याची माहिती समोर आली होती.
-
मात्र नियोजित पद्धतीने इच्छेनुसार लग्नसमारंभ पार पडल्यानंतर त्याच हॉलवर आयोजित करण्यात आलेल्या सेलिब्रेशन पार्टीत नवऱ्याने नवरीला खास गिफ्ट दिलं, अन् गोंधळ झाला.
-
नवरीने उत्साहाने हे गिफ्ट उघडून पाहिलं तर बॉक्समध्ये अंतर्वस्त्रं (लाँजरी) होती. मात्र या अंतर्वस्त्रांची साईज योग्य नव्हती.
-
नवऱ्याने भर पार्टीमध्ये अंतर्वस्त्रं भेट म्हणून दिली आणि ती मुद्दाम छोट्या आकाराची देत आपला अपमान केल्यासारखं वाटल्याने नवरी मुलगी भयंकर संतापली.
-
माझ्या पतीला माझ्या ब्राची साईज ठाऊक होती तरी मुद्दाम त्याने चारचौघात माझी मस्करी करण्यासाठी मला छोट्या आकाराची अंतर्वस्त्रं भेट दिली असा अरोप या महिलेने केला.
-
लग्न समारंभाच्या वेळेस माझा असा अपमान करणारी व्यक्ती भविष्यात माझी कशी काळजी घेणार, असा प्रश्न उपस्थित करत या मुलीने थेट घटस्फोटाची मागणी केली.
-
चीनमधील सोशल नेटवर्किंग साईटवर या लग्नाच्या पार्टीमधील गोंधळाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. यावर अनेकांनी या तरुणीने मांडलेला मुद्दा योग्य असल्याचं म्हटलं होतं.
-
या प्रकरणामध्ये आम्ही आमच्या मुलीच्या पाठीशी आहोत अशी भूमिका लुओ कुटुंबियांनी घेतल्याने लग्न मोडलं.
-
पार्टीच्या सुरुवातीलाच हा गोंधळ झाल्याने मुलीकडच्या नातेवाईकांनी पार्टीमधून काढता पाय घेतला. मात्र मुलगी घटस्फोटाची धमकी देऊन निघून गेल्यानंतरही मुलाकडची मंडळी पार्टी करताना दिसली.
-
या अंतर्वस्त्रांमुळे मोडलेल्या लग्नाची चीनमधील सोशल मिडियावर चर्चा असून दोन गट पडल्याचे चित्र दिसत होतं. अनेकांचं या मुलीच्या म्हणण्याला पाठींबा असला तरी काहींनी थेट घटस्फोटापर्यंत प्रकरण गेल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. फोटो सौजन्य: रॉयटर्स आणि सोशल नेटवर्किंगवरुन साभार)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच