-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
-
अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून या फिल्म्स काही मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणलं होतं. याप्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीलाही अटक केली होती. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मात्र सतत या ना त्या कारणाने चर्चेत असणारे राज कुंद्रा यांचं आयुष्य सुरुवातीपासूनच फार वेगळं राहिलं. सोमवारी पॉर्न फिल्म्ससंदर्भात राज कुंद्रांना अटक करण्यात आली असली तरी त्यांच्याबद्दल वादग्रस्त कायदेशीर प्रकरण सोडल्यास कोणाला फारसं माहिती नाही. त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी…
-
राज कुंद्रा ब्रिटीश नागरिक : राज कुंद्रा यांचे वडील हे लुधियानामधून ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्यानंतर लंडनमध्ये राज यांचा जन्म झाल्याने ते ब्रिटीश नागरिक आहेत.
-
राज कुंद्रांचे वडील हे बस कंडक्टर होते. नंतर त्यांनी एक छोटा उद्योग सुरु केला. राज यांची आई दुकानामध्ये सहाय्यक म्हणून काम करायची.
-
राज कुंद्रा हे कॉलेज ड्रॉप आऊट असून त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षीच शिक्षण सोडलं.
-
२००४ साली सक्सेस मॅगझीनने त्यांना ब्रिटनमधील १९८ वे सर्वात श्रीमंत आशियाई व्यक्ती म्हणून श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान दिलेलं.
-
नेपाळ भेटीनंतर आपलं आयुष्य बदलल्याचं राज कुंद्रा सांगतात. नेपाळ भेटीदरम्यान त्यांनी पश्मीना शाली विकत घेऊन त्या युनायटेड किंग्डममध्ये विकण्यास सुरुवात केली आणि तिथूनच त्यांच्यातील उद्योजकाचा खऱ्या अर्थाने जन्म झाला.
-
हळूहळू राज यांनी हिरे व्यापार सुरु केला. त्यांनी बेल्जियम, रशिया यासारख्या देशांमध्ये व्यापार सुरु केला. त्यांनी आरके कलेक्शन्स लिमिटेड नावाची कंपनी सुरु केली. या कंपनीच्या माध्मयातून ते लंडनमधील फॅशन हाऊसेसला महागडे कपडे विकू लागले. या उद्योगामुळे ते फार श्रीमंत झाले.
-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. अनेकांना माहितं नाही की राज कुंद्रांचे आधी लग्न झाले होते. त्याच्या पूर्वाश्रमीच्य पत्नीच नाव हे कविता आहे.
-
२००९ मध्ये राज कुंद्रा आणि कविता यांचा घटस्फोट झाला. या दोघांना डिलीना नावाची एक मुलगी आहे.
-
राज आणि कविताचा घटस्फोट होण्यामागे शिल्पा शेट्टी कारण ठरल्याची चर्चा मनोरंजन सृष्टीत रंगली होती.
-
राज आणि शिल्पाची पहिली भेट २००७ साली झाली. याच वर्षी शिल्पाने सेलिब्रिटी बिग बॉस हा शो जिंकला होता. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हे दोघे पहिल्यांदा भेटले.
-
शिल्पा आणि राजने २२ नोव्हेंबर २००९ रोजी लग्न केलं.
-
राज कुंद्राची पूर्वाश्रमीची पत्नी कविताने २००७ मध्ये शिल्पावर काही आरोप केले होते. राज आणि मी विभक्त होण्याचं कारण हे शिल्पा असल्याचं कविताने सांगितलं होतं.
-
त्यानंतर राज कुद्रांनी सगळ्यांसमोर येऊन शिल्पाची जाहिरपणे माफी मागितली. एवढंच नाही तर ते दोघे फक्त चांगले मित्र आहेत आणि त्यांचे व्यावसायिक संबंध असल्याचे राजने सांगितले होते.
-
लग्नानंतर दोनच वर्षांनी म्हणजेच २१ मे २०१२ रोजी शिल्पा आणि राज यांनी पुत्ररत्न प्राप्ती झाली. त्यांच्या मुलाचं नाव विवान असं आहे.
-
२०२० साली राज आणि शिल्पाला एक मुलगी झाली. तिचं नाव समीक्षा असं ठेवलं आहे.
-
२००९ मध्ये राज आणि शिल्पा यांनी इंडियन प्रिमियर लीगमध्ये गुंतवणूक केली. त्यांनी राजस्थान रॉयल्सच्या संघाची भागीदारी घेतली होती.
-
२०१३ च्या आयपीएलदरम्यान सट्टेबाजी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी राज कुद्रांची चौकशी केली होती.
-
२०१३ साली आयपीएल सट्टेबाजी प्रकरणावरून राजस्थान रॉयल्सचे सह-मालक राज कुंद्रा यांचे निलंबन करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या नवी दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला होता.
-
कुंद्रांमुळे राजस्थानच्या संघाला स्पर्धेतून दोन वर्षांसाठी बाद करण्यात आलेलं.
-
राज कुंद्रा यांनी शिल्पा शेट्टी समाजकार्यासाठी पैसे जमा करणाऱ्या शिल्पा चॅरिटी फंडमध्येही अनेकदा योगदान दिलं आहे.
-
कुंद्रा यांनी ऑनलाइन टीव्ही प्लॅटफॉर्ममध्येही गुंतवणूक केलेली. बेस्ट डिल टीव्ही असं या प्लॅटफॉर्मचं नाव होतं. नंतर कुंद्रा यांचा हा उद्योग सुद्धा कायदेशीर प्रकरणांमध्ये अडकला.
-
२०१२ मध्ये कुंद्रा यांनी सुपर फाइट लीग लॉन्च केलं होतं. यामध्ये संजय दत्त हा कुंद्रांचा बिझनेस पार्टनर होता.
-
कुंद्रा हे युकेमधील ट्रेडक्रॉप लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अध्यक्षही आहेत.
-
२०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणात राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावलं होतं. राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता. इक्बाल मिर्ची या कुख्यात गुंडासोबत राज कुंद्रा यांनी व्यावसायिक करार केल्याचा संशय ईडीने व्यक्त केलेला. त्यामुळेच राज कुंद्रांना चौकशीला बोलवण्यात आलं होतं.
-
बिटकॉईन घोटाळ्यात राज कुंद्रांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने २०१८ साली समन्स बजावले होते. २ हजार कोटींचा हा बिटकॉईन घोटाळा असण्याचं सांगण्यात आलेलं. समन्स जारी केल्यानंतर ५ जून २०१८ रोजी राज कुंद्रांनी इडीचे कार्यालय गाठले होते. या कार्यालयात इडीच्या अधिकाऱ्यांकडून राज कुंद्रांची कसून चौकशी करण्यात आली.
-
२०१७ मध्येही घोटाळ्यासंदर्भात राज कुंद्रांचे नाव चर्चेत आले होते. कारण ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडा घातल्या प्रकरणात त्यांचे आणि शिल्पा शेट्टीचे नाव चर्चेत आले होते. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि त्यांच्या तीन साथीदारांविरोधात या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
-
बेस्ट डील टीव्ही कंपनीच्या माध्यमातून विविध कंपनीचे प्रोडक्ट विक्रीचा ऑनलाइन शॉपिंगचा व्यवसाय उद्योगपती राज कुंद्रा यांनी पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावाने सुरु केला होता. व्यवसायात नफा व्हावा, यासाठी रवी मोहनलाल भालेरीया या व्यापाऱ्याने बेस्ट डील टीव्ही कंपनी मार्फत ५ कोटी रुपयांच्या बेडशीटची ऑर्डर घेतली होती. या व्यवहारात २३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे, असा आरोप भालेरीया यांनी केला होता. याप्रकरणी शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा, दर्शित शाह, उदय कोठारी, वेदांत विकास बल्ली यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-
सचिन जोशीने राजच्या या आरोपांना उत्तर देताना म्हटले की, राजने या लीगमध्ये गैरव्यवहर केले. या लीगमध्ये कोणती टीम जिंकणार हे त्याने आधीच ठरवले होते. जेव्हा जोशीला याबद्दल माहित पडले तेव्हा त्याने या लीगमधून काढता पाय घेतला. जोशीच्या प्रवक्त्याने सांगितले की, राज कुंद्रासोबत कोणताही करार केला नव्हता, त्यामुळे त्याला पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही.
-
हे दोघे अनेकदा आपले रोमॅन्टीक फोटोही शेअर करताना दिसतात.
-
शिल्पा आणि राज अनेकदा आपल्या मुलांसोबतचे फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर करत असतात.
-
अनेकदा शिल्पा आणि राज हे वेगवेगळ्या कारणांसाठी आणि सोशल नेटवर्किंगवरील पोस्टसाठी चर्चेत असल्याचं दिसून येतं. (सर्व फोटो : सोशल नेटवर्किंग साईट्स आणि पीटीआयवरुन साभार)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”