-
इंधन दरवाढ हा सध्या देशातील सर्वात ज्वलंत विषय आहे असं म्हटल्यासं चुकीचं ठरणार नाही. मागील दोन महिन्यांमध्ये देशातील इंधनाचे दर प्रती लीटरमागे दहा रुपयांनी वाढले आहेत.
-
मोदी सरकारवर याचसंदर्भात विरोधकांकडून टीका केली जात आहे. या इंधन दरवाढीमुळेच दैनंदिन जिवनातील दुधासारख्या गोष्टीही महाग झाल्यात म्हणून आता नेटकऱ्यांनी या इंधनदरवाढीला विरोध करण्यासाठी स्वत: एक मोहीम हाती घेतलीय.
-
#ThankYouModijiChallenge असं या मोहीमेचं नाव असून जिथे जिथे पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो दिसेल तिथे त्यांना नमस्कार करतानाचा पाठमोरा फोटो क्लिक करायचा आणि तो या हॅशटॅगसहीत पोस्ट करायचा सपाटाच तरुणांनी सुरु केलाय. याच ट्रेण्डमधील काही फोटो आपण या गॅलरीमधून पाहणार आहोत.
-
या पाहा एक मॅडम अगदी डोक्यावर हात जोडून मोदींच्या पोस्टरला नमस्कार करत आहेत.
-
आता हा सामुहिक नमस्कार सोहळ्याचा फोटो पाहा.
-
समोर पंपावरील कर्मचारी पेट्रोल भरतोय तोपर्यंत आपण नमस्कार करुन घ्यावा असाच विचार या व्यक्तीने केला असेल.
-
इंधन दरवाढ एवढी आहे की नमस्कार फार छोटा पडेल असं वाटल्याने याने थेट साष्टांग दंडवतच घातलाय.
-
काहींनी तर पार कपडे काढून नमस्कार केलाय.
-
हा नमस्कार कमी विनती अधिक वाटतेय नाही का?
-
विशेष म्हणजे महिलांनाही अशापद्धतीचे फोटो पोस्ट करत इंधन दरवाढीला विरोध केलाय.
-
शहरांमध्येच नाही तर अगदी ग्रामी भागांमध्ये ट्रॅक्टरमध्ये पेट्रोल भरायला येणारेही यात सहभागी झाल्याचं चित्र दिसत आहे.
-
नुसता नमस्कार नाही जिच्यासाठी पेट्रोल लागतं त्याच गाडीच्या टपावर चढून एकाने साष्टांग नमस्कार घातलाय.
-
अरे बुलेट असो की बुलेरो नमस्कार इज मस्त असंच यांचं म्हणणं दिसतंय
-
आमचा राम राम घ्यावा…
-
हा ट्रेण्ड नक्की कोणी सुरु केलाय ठाऊक नाही पण तो वेगाने व्हायरल होतोय हे मात्र खरं. (फोटो सौजन्य : रॉयटर्स, इन्स्ताग्राम आणि ट्विटरवरुन साभार)
![Sun transit in dhanishta nakshtra](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2024-06-08T201503.979.jpg?w=300&h=200&crop=1)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा