-
मिशीगन येथील वैदेही डोंगरे या २५ वर्षांच्या विद्यार्थिनीस मिस इंडिया यूएसए २०२१ किताबाने गौरवण्यात आले आहे. (सर्व फोटो vaidehidongre/instagram)
-
महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच साक्षरता यावर भर देण्यासाठी आपण या स्पर्धेत भाग घेतला, असे तिने सांगितले. तिला तिच्या उत्तम कथक सादरीकरणासाठी मिस टॅलेंटेड पुरस्कारही मिळाला.
-
या वेळी १९९७ मधील मिस वर्ल्ड डायना हेडेन आणि मिस वर्ल्ड अमेरिका वॉशिंग्टन श्री सैनी या प्रमुख पाहुण्या व परीक्षक होत्या.
-
डोंगरे ही मिशीगन विद्यापीठातून पदवीधर झालेली असून ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ हा तिचा अभ्यासाचा विषय आहे. ती एका नामांकित कंपनीत व्यवसाय विकास व्यवस्थापक आहे.
-
वैदही आणि तिचा लहान भाऊ विनित डोंगरे
-
वैदहीने "आई बाबा तुम्ही मला आणि विनीतला सकारात्मक उर्जा आणि कष्ट करण्याची ताकद दिलीत" असं म्हणत त्यांचे आभार मानले.
-
वैदहीचा जन्म भारतात झाला आहे आणि ती अमेरिकेत वाढली आहे. तिला मिळालेला मान हा तिचा आईसाठी आहे असं ती आवर्जून सांगते.
-
जॉर्जियाची आर्शी लालानी ही दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली तर उत्तर कॅरोलिनातील मीरा कासारी हिला तिसरा क्रमांक मिळाला.
लालानी (वय २०) हिनेही चांगली कामगिरी केली असून तिने दुसरा क्रमांक मिळवला. तिला मेंदूत गाठ असूनही तिने हे यश मिळवले आहे. (फोटो: arshilalani/instagram) -
तीस राज्यांतील ६१ जण या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनी यापूर्वी मिस इंडिया यूएसए, मिसेस इंडिया यूएसए, मिस टीन इंडिया यूएसए स्पर्धांत भाग घेतला होता. या तीनही गटांतील विजेत्यांना मुंबईच्या प्रवासाची तिकिटे मोफत देण्यात आली आहेत.
-
न्यूयॉर्क येथील अमेरिकी भारतीय धर्मात्मा व नीलम सरण यांनी जागितक सौंदर्य स्पर्धा म्हणून चाळीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा मिस इंडिया यूएसए ही स्पर्धा सुरू केली होती.
१५ मार्च पंचांग: बुधाचे राशी परिवर्तन १२ राशींसाठी शुभ ठरेल की अशुभ? तुमच्या आयुष्यात काय बदलणार? वाचा राशिभविष्य