-
घरामध्ये एखादा साप शिरल्यानंतर होणारी धावपळ आणि गोंधळचा अनेक व्हायरल व्हिडीओ आपण यापूर्वी सोशल नेटवर्किंगवर पाहिले असतील. मात्र ओडिशामधील एका घरात शिरु पाहणाऱ्या कोब्राला घरातील पाळीव मांजरीने रोखून धरल्याची घटना समोर आलीय. (प्रातिनिधिक फोटो : रॉयटर्स)
-
ओडिशामधील भुवनेश्वर येथे राहणाऱ्या संपद परिदा यांच्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या कोब्रासमोर त्यांची पाळीव मांजर आडवी आली.
-
संपद यांची मांजर अशाप्रकारे घरामध्ये शिरु पाहणाऱ्या कोब्रासमोर जवळजवळ अर्धा तास बसून होती. सर्पमित्र येईपर्यंत ती अशीच बसून राहिल्याने कोब्राला घरात प्रवेश करता आला नाही. ( फोटो : एएनआय )
-
संपद यांनी सर्पमित्रांना हेल्पलाइन क्रमांकावरुन फोन केला. हे सर्पमित्र येईपर्यंत अर्धा तासाचा कालावधी गेला तरी ही मांजर त्या कोब्रासमोर बसून होती. (प्रातिनिधिक फोटो : रॉयटर्स)
-
मागील दीड वर्षांपासून ही मांजर आमच्याकडे आहे आणि ती आमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच आहे, असं संपद सांगतात. त्यांच्या घरातील याच सदस्याने दाखवलेल्या हिंमतीमुळे मोठा अनर्थ टळला असं म्हणावं लागेल. ( फोटो : एएनआय )
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य