-
ईशान्य भारताच्या त्रिपुराच्या एका छोट्याशा गावात, २६ वर्षीय नील रनौत नावाचा तरुण पानं, काड्या, दगड, फुले, कागद यासारख्या उपलब्ध साहित्याचा वापर करत कपडे बनवतो.(सर्व फोटो: @ranautneel /Instagram)
-
त्याचं इन्स्टाग्रामवर @ranautneel या नावाने अकाऊंट आहे. या अकाऊंटच्या बायो मध्ये त्याने स्वतःला ‘व्हिलेज फॅशन इन्फ्लुएन्सर’ म्हणतो. पुढे तो “मला माझा अभिमान आहे आणि लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याची काळजी मी करत नाही.”
-
नीलचे इन्स्टाग्रामवर ३३ हजार फॉलोअर्स आहेत आणि त्यांच्या पोस्टला अगदी लाखांच्या घरातही लाईक्स असतात.
-
अलीकडेच नीलच्या काही पोस्ट व्हायरल झाल्या. या पोस्टमध्ये त्याने सेलिब्रिटींच्या फोटोजला हुबेहूब उपलब्ध साहित्यातून बनवून फोटो काढलेले दिसून येतील.
-
“माझं आधी फॅशनवर खरोखर प्रेम नव्हते. सुरुवातीला मलाही ज्ञानाचा अभाव होता. २०१८ मध्ये मी टिकटॉक व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. म्हणूनच मी इन्स्टाग्रामवर अकाउंटही बनवलं.” असं नील सांगतो.
-
एका दिवशी अभिनेत्री दीपिका पादुकोणचा फोटो मी बघितला. २०१९ मध्ये तिने एका पुरस्कार सोहळ्यात घातलेल्या तिच्या हिरव्या रंगाच्या ड्रेसमुळे ट्रोल केलं.
-
“जेव्हा मी पाहिले की ती या ड्रेसमुळे ऑनलाइन ट्रोल होत आहे, तेव्हा मी केळ्याच्या पानांसह स्वत:च्या पद्धतीने ड्रेस बनवण्याचा निर्णय घेतला. मी काही फोटो क्लिके आणि इन्स्टाग्राम, फेसबुकवर अपलोड केले. त्यावर लोकांनी कमेंट केल्या पण मी मी त्याबद्दल फारसा विचार केला नाही. ”असं नीलने सांगितले.
-
मला अचानक अशा कल्पना सुचतात; मी जास्त विचार करत नाही. असं तो सांगतो “पण मुंबईतील कुणाला तरी माझं काम आवडलं हे खूप मोठ होतं. याने मला अधिक चांगलं काम करण्यास प्रवृत्त केले.”
-
आज रनौतला विश्वास आहे की तो कुठल्याही सेलिब्रिटीच्या लुकला रीक्रीयेट करू शकेल.
-
त्याच्या आयुष्यात एक अशी वेळ अशी होती जेव्हा त्याला फॅशनचा अभ्यास करायचा होता. यावर तो म्हणतो “परंतु त्रिपुरामध्ये मी हे करू शकत नाही. तिथे काम करून मुंबईतही हे मोठ होण्याच स्वप्न मी पाहिले आहे. पण आता जे मी करत आहे त्यात मी आनंदी आहे.”
-
रनौत यांने स्पष्ट केले की तो सहसा एका ड्रेसवर काम करतो आणि नंतर तो ड्रेस दुसर्या लुकसाठीही मॉडीफाय करतो.
-
इंडियन एक्प्रेस सोबत मुलाखतीच्या दरम्यान, रनौत यांने हेही उघड केले की त्याचे खरे नाव ‘सरबजित सरकार आहे. ‘ नील रनौत’ हे त्याचे खरे नाव नाही. तो सांगतो “मी स्वतःला असे म्हणतो कारण मला ‘निळा’ (निल) रंग आवडतो आणि अभिनेत्री कंगना रनौतचा मी चाहता आहे.

पिंपरी-चिंचवड अन् भोवतालच्या पाच किलोमीटर परिसरातील शेकडो गृहप्रकल्प अडचणीत