-
टोक्यो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा आज (शुक्रवारी, २३ जुलै २०२१ भारतीय वेळेनुसार) पार पडत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली.
-
मात्र टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेवर करोनाचे सावट असल्याने काही विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अगदी उद्घाटन सोहळ्यांना निवडक खेळाडूंची उपस्थितीपासून ते खेळाडूंनी जवळीक साधू नये म्हणून अगदी अॅण्टी सेक्स बेड्सपर्यंतच्या उपाययोजना करण्यात आल्यात.
-
ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी दुसऱ्या खेळाडूसोबत जवळीक करु नये या उद्देशाने अॅण्टी सेक्स बेड्सचा वापर यंदा ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये खेळाडूंची राहण्याची सोय करण्यात आलेल्या ठिकाणी केलीय.
-
अॅण्टी सेक्स बेड्स हे पुठ्ठ्यापासून बनवण्यात आलेले आहेत. ऑलिम्पिकच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही या बेड्सचा फोटो ट्विट करण्यात आला होता.
-
अमेरिकेचा खेळपटू पॉल चेलीमोने ऑफिशल अकाउंटवरून ट्विट करत चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
-
टोकियो ऑलिम्पिकचे आयोजक जपानमधील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सामाजिक अंतर राखण्याच्या म्हणजेच सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य देण्याच्या कल्पनेला प्रोत्साहन देत असल्यानेच या बेड्सची निर्मिती करण्यात आलीय.
-
“टोकियो ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये खेळाडूंसाठी देण्यात आलेले हे बेड्स पुठ्ठ्यापासून बनवलेले आहेत, खेळाडूंमधील जवळीक टाळणे हे या बेड्सचं उद्दीष्ट आहे. हे बेड्स एकाच व्यक्तीचे वजन सहन करु शकतात,” असं बेड्सचे फोटो शेअर करताना पॉल चेलीमोने म्हटलंय.
-
याचं ट्विटच्या थ्रेडमध्ये पॉल चेलीमोने एक मजेशीर कमेंट केलीय. “या क्षणी मला खाली जमिनीवर झोपायचं कसे याचा सराव करावा लागेल असं दिसत आहे. कारण माझा बेड कोसळला तर मला जमिनीवर झोपायचं कसं याचं हे ठाऊक नाही,” असं चेलीमोने म्हटलं आहे.
-
चेलीमोच्या ट्विटने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले. अनेकांना हे बेड्स पाहून आश्चर्य वाटलं आहे. काहींनी तर हे बेड्समुळे खेळाडूंना कोविड-१९ चा संसर्ग होण्यापासून वाचवण्याऐवजी वढवतील अशी भीती व्यक्त केलीय. काहींनी याला बेड्सच म्हणून नये असं मत व्यक्त केलंय.
-
"हे बेड्स म्हणजे मूर्खपणाच लक्षण आहे. जे प्रौढ आहेत ते काहीही केलं तरी त्यांना हवं ते करू शकतात," अशी एकाने प्रतिक्रिया नोंदवली. तर काहींनी या कल्पनेला पाठिंबा दर्शविला आणि ही संकल्पना योग्य आहे असं म्हटलं आहे.
-
टोक्यो २०२० च्या आयोजकांनी टोक्यो ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये खेळाडूंसाठी १,६०,००० कंडोम देण्याच्या उद्देशाने चार कंडोम कंपन्यांशी करार केला आहे.
-
आयोजकांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, कंडोम वाटप खेळाडूंनी ते ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये वापरण्यासाठी दिलेले नाहीत असं सांगितलं. हे कंडोम त्यांनी आपआपल्या मायदेशी घेऊन जाण्यासाठी देण्यात आलेत.
-
मायदेशी जाऊन खेळाडूंनी एचआयव्ही आणि एड्सबद्दल जागरुकता करण्यासाठी हे कंडोम देण्यात आल्याचं म्हटलं आहे.
-
आता एकीकडे अॅण्टी सेक्स बेड्स आणि दुसरीकडे कंडोम वाटप यामुळे काही नेटकऱ्यांनी हा काय गोंधळ आहे असा प्रश्न उपस्थित केलाय. एकीकडे खेळाडूंनी जवळ येऊ नये म्हणून अॅण्टी सेक्स बेड्स आणि दुसरीकडे कंडोम वाटप हा काय प्रकार आहे असं काहींनी सोशल नेटवर्किंगवर म्हटलं आहे.
-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये करोना विषाणूचा धोका वाढत आहे. शुक्रवारी, टोक्यो ऑलिम्पिकशी संबंधित १९ जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे. यासह, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये करोना रुग्णांची संख्या १०० च्या वर गेली आहे. चेक प्रजासत्ताकचा चौथा खेळाडू रोड सायकल चालक मिशेल श्लेगल हा करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. (सर्व फोटो ट्विटर आणि रॉयटर्सवरुन साभार)
![Sun transit in dhanishta nakshtra](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2024-06-08T201503.979.jpg?w=300&h=200&crop=1)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा