-
७७ वर्षाच्या आज्जी आणि ८१ वर्षाचे आजोबा या जोडीचं इस्टाग्रामवर ‘मिस्टर अॅण्ड मिसेस वर्मा’(Mr. & Mrs. Verma) नावच अकाऊट आहे. त्याचं हे अकाऊट अन्य तरुण फॅशन इन्फ्लुएन्सर पेक्षा कमी नाही.
-
यांच्या अकाऊटवर आतापर्यंत १०० पोस्ट आहेत आणि जवळ जवळ ५० हजार फॉलोअर्स आहेत. त्यांच्या व्हिडीओ किंवा फोटोला हमखास हजारोंच्या घरात लाईक्स असतात.
-
त्यांच्या इस्टाग्राम अकाऊटच्या बायो मध्ये म्हणजेच जिथे आपली माहिती थोडक्यात लिहायची असते तिथे या जोडप्याने ‘प्लेइनिंग कूल अफ्टर ७० , आमचा विश्वास आहे की वय अडथळा नाही, स्लेयिंग आणि हास्य पसरवत आहोत.’ असं लिहलेलं आहे.
-
“लॉकडाऊनमध्ये माझ्या नातीने मला इन्स्टाग्रामची ओळख करून दिली आणि तेव्हापासून मला इन्स्टाग्रामने पकडून ठेवले आहे. ” असं श्रीमती वर्मा ह्यूम्स ऑफ बॉम्बेच्या एका पोस्टमध्ये सांगतात.
-
वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइनर कपडे घालून आज्जी आजच्या पिढीलाही फॅशन टिप्स देतात.
-
फक्त आज्जीच नाहीत तर आजोबाही वेस्टर्न लुकमध्ये एकदम कूल दिसतात.
-
केवळ भारतीय कपडेच नव्हे तर वेस्टर्न लुकदेखील आज्जी एकदम सहज कॅरी करतात.
-
व्हिडिओसोबत आजोबांचे मिम्सही नेटीझन्सला आवडतात.
-
ही जोडी ट्रेण्डींग विषयावर, गाण्यांवर सुंदर व्हिडिओसुद्धा बनवतात सोबतच सोशल मिडियावर ट्रेण्ड मध्ये असलेले चॅलेंजही करतात. तुम्हाला या जोडीचा स्टाईलिश आणि धमाकेदार डान्सही बघायला मिळेल.
-
वर्मा दाम्पत्याच्या लग्नाला ६१ वर्ष झाली आहेत.
-
फॅशन टिप्स सोबत आज्जी स्टायलिंगच्याही टिप्स देतात. कोणते फॅशन ट्रेण्ड सुरु आहेत हे सुद्धा व्हिडीओच्या माध्यमातून सांगतात.
-
दररोज फोटो किंवा इतर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करून लोकांना रोज आश्चर्यचकित करायचं काम ही जोडी आवर्जून करतेय.
-
वय जरी मोठ असलं तरी हृदय अजूनही तरुण आहे याच उत्तम उदाहारण म्हणजे वर्मा दाम्पत्य आहे.
या जोडीचे फोटो पाहून नेटीझन्स तुम्ही ‘कपल गोल’ आहात, तरुण जोडी असही म्हणतात. (सर्व फोटो : Mr. & Mrs. Verma/ Instagram)

Pakistan PM Shahbaj Sharif : “पहलगाम हल्ल्याप्रकरणी आम्ही तटस्थ चौकशीला तयार”; पाकिस्तानच्या पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया!