-
बुधवारी, द हण्ड्रेड क्रिकेट मालिकेतील महिला संघांचा पहिला सामना पार पडला. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या या सामन्यामध्ये महिला क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय खेळाडू दोन वेगवेगळ्या संघामध्ये पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली.
-
मँचेस्टर ओरिजनल्स आणि ओव्हल इनव्हीजीबल्स या दोन संघांमध्ये हा सामना रंगला. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरही या सामन्यामध्ये मँचेस्टर ओरिजनल्स संघाकडून खेळली. हा तिचा या स्पर्धेतील पहिलाच सामना होता.
-
हरमनप्रीतने ओव्हल इनव्हीजीबल्सच्या गोलंदाजांचा आपल्या छोट्याश्या खेळीमध्ये चांगलाच समाचार घेत शानदार चौकार लगावले.
-
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हरमनप्रीतने अवघ्या १६ चेंडूंमध्ये २९ धावांची वेगवान खेळी केली. या खेळीचा फायदा तिच्या संघाला झाला आणि त्यांना समाधानकारक धावसंख्या उभारता आली.
-
३२ वर्षीय हरमनप्रीतने आपल्या खेळीमध्ये सहा चौकार लगावले. म्हणजेच तिच्या २९ धावांपैकी २४ केवळ चौकारांच्या माध्यमातून आल्या.
-
हरमनप्रीत २९ धावांवर बाद झाली मात्र तिच्या संघाला वेगाने धावा करता आल्या नाहीत. स्पर्धेच्या नावाप्रमाणे या स्पर्धेत प्रत्येक संघाला १०० चेंडू खेळायला मिळतात. त्यामध्ये हरमनप्रीतच्या संघाने १३६ धावांपर्यंत मजल मारली. मात्र विरोधी संघाने दोन चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य पूर्ण केलं अन् हरनमप्रीतचा संघ पराभूत झाला.
-
संघ पराभूत झाला तरी हरमनप्रीतच्या या खेळीचं क्रिकेट चाहत्यांबरोबरच सर्वच स्तरातील खेळाडूंनी कौतुक केलं. या कौतुक करणाऱ्यांमध्ये इंग्लंड संघातील सदस्य असणाऱ्या सॅम बिलिंग्सचाही समावेश होता.
-
सॅम बिलिंग्सने ट्विटरवरुन हरमनप्रीतचं कौतुक करताना, "Harmanpreet Kaur Is A Gun!", असं म्हटलं. म्हणजेच बंदुकीमधून गोळ्या ज्या वेगाने निघातात त्याच वेगाने हरमनप्रीतच्या बॅटमधून धावा निघतात असं बिलिंग्सला म्हणायचं होतं. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधारावर इंग्लंडच्या खेळाडूने केलेली ही कमेंट अनेकांनी चुकीच्या अर्थाने घेतल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
-
मात्र हरनप्रीतचं कौतुक केल्यानंतरही भारतीय क्रिकेट चाहत्यांनी बिलिंग्सला ट्रोल केलं. विशेष म्हणजे बिलिंग्स हरमनप्रीतला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असल्याची नसती शंका क्रिकेट चाहत्यांच्या डोक्यात येऊन गेल्याचं बिलिंग्सच्या या ट्विटवरील कमेंट्समधूनच पहायला मिळालं.
-
अनेकांनी या ट्विटवरुन सॅम बिलिंग्सला ट्रोल केलं आहे. विशेष म्हणजे भारतीयांनी सॅम हरमनप्रीतला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय पण प्रयत्न करु नकोस असा मजेदार सल्लाही त्याला दिलाय. पाहुयात काही रिप्लाय…
-
ए आमच्या पोरीवर लाइन मारायचं बंद कर, असं एका भारतीय चाहत्याने म्हटलं आहे.
-
तिच्या नादी नको लागू ती भारतीय व्यक्तीशीच लग्न करेल, असा टोला एकाने लगावलाय.
-
याला फार भाव देऊ नको असा सल्ला एकाने थेट हरमनप्रीतला टॅग करत दिलाय.
-
आमच्या बहिणीवर लाइन मारतोय काय?, असं एकाने विचारलंय
-
इंग्रजी खेळाडू तिचा खेळ पाहून तिच्या प्रेमात पडला असं एकाने म्हटलंय.
-
आमच्या मुली काही मुलांपेक्षा कमी नाही, अशीही कमेंटही यावर करण्यटात आलीय.
-
हरमनप्रीत काय उत्तर देतेय याची वाट पाहतोय, असं एकाने म्हटलंय.
-
एकाने स्मृती मंधानाचा फोटो पोस्ट करत हरनप्रीतला गन म्हटलं तर हिला काय म्हणावं असं प्रश्न विचारलाय.
-
पुरुष महिला क्रिकेटपटूंचं कौतुक करतात
-
एकीने लगान माफ केला असं समजायचं का असा प्रश्न या ट्विटवर विचारलाय.
-
सॅम बिलिंग्स स्वत: द हंड्रेडमध्ये खेळत असल्याने तो ही स्पर्धा फॉलो करतोय. या स्पर्धेसंदर्भात तो अनेकदा सोशल मीडियावरुन व्यक्त होत असतो.
-
मात्र हरमनप्रीतबद्दलच्या कमेंटवरुन तो ट्रोल झाल्याचं पहायला मिळतंय.
-
हरमनप्रीतच्या संघाचा पुढील सामना रविवारी २५ जुलै रोजी बर्मिंगहॅम फिनॉक्स संघाशी होणार आहे. पुन्हा एकदा हरमनप्रीतच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. (सर्व फोटो : ट्विटर, फेसबुक आणि रॉयटर्सवरुन साभार)

आजचे राशिभविष्य: मार्च महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असणार? ‘या’ राशींना जोडीदाराची उत्तम साथ व भागीदारीत होईल लाभ