-
तेलंगण राज्यातील वारंगलजवळील पालमपेट, मुलुगु जिल्ह्यात रुद्रेश्वराच्या मंदिराचे नाव (रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाणारे) युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये कोरले गेले आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या ४४ व्या अधिवेशनात २५ जुलै रोजी हा निर्णय घेण्यात आला.
-
१३ व्या शतकातील अभियांत्रिकी चमत्कारीक रामप्पा मंदिराचे सन २०१९ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा साइट टॅगसाठी एकमेव नामांकन म्हणून सरकारने प्रस्तावित केले होते. याची माहिती युनेस्कोने त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊटवरून पोस्ट करत केली. “नुकतेच जागतिक वारसा स्थळ म्हणून भारतातील तेलंगणा येथील काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर लिहले गेले आहे. ब्राव्हो!” हे ट्वीट करत घोषणा केली.
-
१२१३ एडी मध्ये रुद्रेश्वराचे मंदिर काकतीयचा रिचर्ला रुद्र काकतीयाचा सेनापती राजा गणपतीदेवा यांच्या काकतीयचा साम्राज्याच्या कारकिर्दीत बांधले गेले होते. येथील प्रमुख देवता रामलिंगेश्वरस्वामी आहेत. या मंदिराची रामप्पा मंदिर म्हणूनही ओळख ४० वर्षापासून मंदिरात काम करणाऱ्या शिल्पकारानंतर झाली.
-
काकातीयांच्या मंदिर संकुलांमध्ये एक वेगळी शैली, तंत्रज्ञान आणि सजावट आहे जे काकातीयन शिल्पकाराचा प्रभाव दर्शवितात. रामप्पा मंदिर हे काकातीयन सर्जनशील अलौकिकतेचे प्रशंसापत्र म्हणून उभे राहते.
-
काळाशी संबंधित विशिष्ट शिल्पकला,सजावट आणि काकातीयन साम्राज्य हे एक उत्कृष्ट वैश्विक मूल्य आहे.
-
या मंदिराला अनेक पर्यटक आवर्जून भेट देतात. यात फक्त भारतीय नाही तर अन्य देशातील पर्यटकही असतात. युरोपियन व्यापारी आणि पर्यटक मंदिराच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाले. अशाच एका प्रवाशाने असे म्हटले होते की हे मंदिर म्हणजे "दक्कनच्या मध्ययुगीन मंदिरांच्या आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी तारा" आहे.
-
कोविड -१९ मुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक २०२० मध्ये होऊ शकली नाही. २०२० आणि २०२१ साठीच्या अर्जांवर ऑनलाईन बैठकीत चर्चा करण्यात आली. रामप्पा मंदिराबद्दल चर्चा रविवारी २५ जुलै २०२१ रोजी झाली.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख