-
राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून तसेच पुरामुळे आतापर्यंत १५० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून ६४ जण अजूनही बेपत्ता आहेत, तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कोकणात दरडी कोसळल्याने तसेच पुरात वाहून गेल्याने ८३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
-
कोकणातील पावसाचा जोर ओसरला असला तरी पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कायम असल्याने पंचगंगा नदीच्या पुराचा कोल्हापूरला विळखा पडला असून जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर कृष्णा नदीच्या पुरामुळे सांगलीला मोठा फटका बसला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत पुरामुळे २ लाख १० हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
-
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पाऊस कोसळत आहे. कोकणात पावसाने विश्रांती घेतली असली तरी कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत अजूनही पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर ओसरल्याने रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत पूरपरिस्थिती आता नियंत्रणात आल्याचे राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले आहे.
-
मात्र अशाप्रकारे केवळ महाराष्ट्रात किंवा भारतामधील इतर भागांमध्येच पूर आला नसून जगभरातील अनेक देशांमध्ये पूर आले आहेत. याचसंदर्भातील एक पोस्ट सध्या इस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. युथ फॉर क्यामेट इंडिया (youthforclimateindia) या पेजवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आलीय.
-
पूर येणं ही गोष्ट आता आपण सर्वसामान्य आहे असं मानू नये असं या पोस्टच्या पहिल्याच फोटोमध्ये म्हटलं असून पुढे नऊ वेगवेगळ्या देशांमधील पूरपरिस्थितीची दाहकता दर्शवाणे फोटो शेअर केलेत. पाहूयात जगभरातील कोणत्या देशांमधील पूर सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत.
-
नेदरलँड्सलाही पुराचा मोठा फटका बसलाय. मात्र योग्य नियोजनामुळे इथे फार मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली नाही.
-
जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला असून शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये वातावरण बदल म्हणजेच क्लायमेट चेंज हा येथील महत्वाचा मुद्दा असणार आहे.
-
भारतामध्ये काही आठवड्यांपूर्वी मुंबई तुंबली होती, त्यानंतर कोकण, कोल्हापूर, सांगली यासारख्या ठिकाणी पूर आहे. तसेच हरयाणा आणि उत्तरेकडील काही राज्यांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेली.
-
फ्रान्सलाही यंदा पूराचा मोठा फटका बसलाय.
-
लक्झ्मबर्ग या देशालाही पूराचा फटका बसलाय. येथे हजारो संसार उद्धवस्त झालेत.
-
बेल्जियममध्येही पूरामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून पाच जण अद्यापही बेपत्ता आहेत, मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी गल्ल्यांमध्ये शिरले आणि त्यामध्ये अनेक गाड्या वाहून गेल्या आणि घरे कोसळली असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
-
वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओमानलाही पुराचा फटका बसलाय.
-
न्य़ूझीलंडमधील ऑटेरोवामध्येही मोठा पूर आलाय.
-
अमेरिकेतील अनेक भागांमध्ये पूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून यामध्ये कोकणची तुलना ज्या कॅलिफॉर्नियाशी केले जाते तिथेही पुराचे संकट ओढावलेय.
-
महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातील पुराचीही जगभरामध्ये चर्चा आहे.
-
त्यामुळेच एकंदरित हे सर्व फोटो पाहिल्यावर वातावरण बदलाचा हा परिणाम नाही ना अशी शंका अनेकांनी उपस्थित केलीय. (युथ फॉर क्यामेट इंडिया (youthforclimateindia) या पेजवरुन साभार तसेच कोकणातील फोटो फाइल फोटो आहेत.)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख