-
सर्वसाधारणपणे कमी किमतीतल्या कारमध्ये सनरुफची सुविधा दिली जात नाही. ही सुविधा आतापर्यंत हाय-एंड प्रकारातील कारमध्ये बहुतांश वेळा दिली जात असे.
-
परंतु अधिकाधिक सोयीसुविधा पाहण्याकडे भारतीयांचा कल लक्षात घेऊन कार निर्मात्या कंपन्यांनी दहा लाख रुपयांच्या आतील किमतीमध्ये काही कार्स बाजारात आणल्या असून या कारमध्ये सनरुफची सुविधा देण्यात आली आहे. जाणून घेऊयात अशाच काही गाड्यांबद्दल ज्या १० लाखांच्या आत आहेत आणि त्यांना सनरुफही आहे…
-
होंडा डब्ल्यूआर-व्ही-व्हीएक्स पेट्रोल > होंडाची कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातील ही कार असून अत्याधुनिक एक्सटेरियल स्टायलिंग, सुंदर इंटिरियर आणि पेट्रोल व डिझेल दोन्हींमध्ये बीएस-६ अनुरूप इंजिन आहेत.
-
इतर आकर्षक फीचर्स जे या प्रीमियम स्पोर्टी लाइफस्टाइल वाहनामध्ये आहेत ते म्हणजे प्रशस्त केबिन, एलईडी हेडलॅम्प्स आणि फॉग लॅम्प्स, रियर वायपर आणि वॉशर, कीलेस एंट्री, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, क्रूझ कंट्रोल, एलईडी हेडलॅम्प्स आणि फॉग लॅम्प्स, रियर वायपर आणि वॉशर, कीलेस एंट्री, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, क्रूझ कंट्रोल, सात इंची इन्फोटेइंटमेंट स्क्रीन सिस्टीम अशा सुविधा होंडा डब्ल्यूआर-व्ही-व्हीएक्समध्ये आहेत.
-
होंडा डब्ल्यूआर-व्ही-व्हीएक्सची किंमत ९ लाख ७५ हजार रुपये इतकी आहे.
-
ह्युंदाई व्हेन्यू एसएक्स टबरे > सनरुफ सुविधा असलेली ही स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल प्रकारातील कार असून लेदर इंटिरियर असलेली ही कार आहे.
-
९.९९ लाख रुपये किंमत असलेली ही देखणी कार आहे. सिक्स स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत देण्यात आले असून डिझेल व्हेरिएंटमध्येही हे मॉडेल उपलब्ध आहे.
-
फोर्ड इकोस्पोर्ट टिटॅनियम > या कारच्या पेट्रोल व डिझेल दोन्ही प्रकारांत सनरुफची सुविधा उपलब्ध आहे.
-
त्याबरोबरच रियरव्ह्य़ू कॅमेरा, टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीमसह या गाडीला हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत.
-
फोर्ड इकोस्पोर्ट टिटॅनियममधील पेट्रोल व्हेरिएंट मॉडेलची किंमत ९ लाख ९९ हजार रुपये इतकी आहे.
-
महिंद्रा एक्सयूव्ही ३०० डब्ल्यू ६ > या स्पोर्ट्स कारचे बेसिक वगळता इतर सर्व व्हेरिएंट सनरुफसज्ज आहेत.
-
या कारमध्ये नवीन-पिढीतील ग्राहकांमध्ये प्रसिद्ध असलेली सर्व फीचर्स आहेत. बेस मॉडेलमध्ये रियर डिस्क ब्रेक आहेत आणि सात एअरबॅग, हिल स्टार्ट असिस्ट आणि फ्रंट पार्किंग सेन्सर असे कारचे फिचर्स आहेत.
-
महिंद्रा एक्सयूव्ही ३०० डब्ल्यू ६ ची किंमत ९ लाख २७ हजार रुपये इतकी आहे.
-
होंडा जॅझ झेडएक्स > प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील मॉडेलमध्ये वन-टच इलेक्ट्रिक सनरुफ, प्रशस्त केबिन स्पेस आणि ३५४ लिटरची कागरे स्पेस अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
-
नवीन सॉफ्ट टचपॅड डॅशबोर्ड, क्रूझ कंट्रोल, टचस्क्रीन कंट्रोल पॅनलसह ऑटो एसी, टेलीफोनी आणि व्हॉइस कंट्रोल्स, पॅडल शिफ्टर्स (सीव्हीटी व्हेरिएंट फक्त) व स्मार्ट कनेक्टिव्हिटी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्याची किंमत ८ लाख ८९ हजार रुपये इतकी आहे.
-
टाटा नेक्सॉन एसएम > टाटा नेक्सॉनच्या एसएम व्हेरिएंट या कारमध्ये सनरुफची सुविधा आहे.
-
मिड-स्पेक मॉडेलमध्ये आकर्षक फीचर्स आहेत. उदाहरणार्थ रेन-सेंसिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प्स, ऑटो-फोल्डिंग आऊटसाइड रियरव्ह्य़ू मिर्स आणि चार स्पीकर हार्मन साऊंड सिस्टीम अशा सुविधा कारमध्ये आहे.
-
टाटा नेक्सॉन एसएम ही कार पेट्रोल व्हेरिएंटमध्ये ८ लाख ६७ हजार रुपयांना उपलब्ध आहे.
-
ह्य़ुंदाई आय २० अॅस्टा (ओ) > कारच्या या व्हेरिएंटमध्ये विद्युत सनरुफची सुविधा देण्यात आली आहे.
-
कारचे फीचर्स सेमी-डिजिटल क्लस्टर, एअरबॅग, चाइल्ड सीट माऊंट आणि ब्लूलिंक जोडलेले कारचे तंत्रज्ञान उपलब्ध असून याची किंमत ९ लाख ३३ हजार रुपये आहे. (सर्व फोटो संबंधित कंपन्यांच्या वेबसाईट आणि सोशल मीडियावरुन साभार)

विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?