-
काही वर्षांपूर्वी अडल्ट चित्रपटांमध्ये काम करणारी आणि पॉर्न स्टार म्हणून ओळखली जाणारी मिया खलिफा सध्या सोशल मीडियावरील इन्फ्लूएन्सर म्हणून जगभरामध्ये ओळखली जाते.
-
दोन वर्षांपूर्वी मियाने आपल्या लग्नासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुनच पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.
-
मात्र आता मियाने सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन एक धक्कादायक घोषणा केलीय.
-
मियाने पती रॉबर्ट सँडबर्गपासून विभक्त होण्याची घोषणा इन्स्टाग्रामवरुन केलीय.
-
मियाने आपल्या सोशल नेटवर्किंग हॅण्डलवर यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आम्ही दोघांनी आमचं लग्न टीकावं यासाठी खूप प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे.
-
मात्र आम्हाला हव्या त्या पद्धतीने गोष्टी जूळून आल्या नाहीत, असंही या दोघांनी म्हटलं आहे. त्यामुळेच आम्ही आता वेगळं होण्याचा निर्णय घेत आहोत असं मियाने स्पष्ट केलं आहे.
-
या पोस्टमध्ये मियाने आम्ही दोघेही एकमेकांपासून वेगळं होण्यासंदर्भात मागील एका वर्षापासून थेरिपी घेत असल्याचाही खुलासा दोघांनी केलाय.
-
“आमचं लग्न टिकावं म्हणून आम्ही सर्व प्रयत्न केले असं आम्हाला आत्मविश्वासाने सांगता येईल,” ही या तुटलेल्या संसरातील सकारात्मक बाब असल्याचं मियाने म्हटलंय.
-
“जवळजवळ एक वर्ष यासंदर्भातील थेरेपी आणि प्रयत्न करुन झाल्यानंतर आम्ही या निर्णयापर्यंत पोहचलो आहोत की आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र राहू शकतो,” असं या दोघांचं म्हणणं आहे.
-
“आम्ही आमचं लग्न (संसार) वाचवण्यासाठी बरीच खटाटोप केली. आम्ही दोघे एकमेकांवर नेहमी प्रेम करत राहू आणि एकमेकांचा आदर करु,” असं मियाने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
-
“आयुष्यातील हा सुंदर चॅप्टर बंद करताना आम्हाला कसलाही पश्चाताप होत नाहीय. आम्ही दोघे नव्याने सुरुवात करणार आहोत,” असा विश्वास या दोघांनी व्यक्त केलाय.
-
मियाने पती रॉबर्ट सँडबर्गपासून विभक्त होण्याची घोषणा इन्स्टाग्रामवरुन केलीय.
-
आम्ही वेगळे होणार असलो तरी आमची कुटुंब, मित्र परिवार आणि लाडक्या पाळीव कुत्र्यांवर असणारं प्रेम तसच राहणार आहे, असंही हे दोघे म्हणालेत.
-
आम्ही लग्न टीकावण्यासाठी प्रय़त्न केले, वेळ घेतला याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही शक्य ते सर्व काही केलं, असं या दोघांनी आपल्या चाहत्यांना सांगितलंय.
-
“फार प्रयत्न केल्यानंतरच आम्ही दूर जाण्याचा निर्णय घेतलाय. हे प्रयत्न केल्याचं समाधान आम्हाला आहे,” असं या पोस्टमध्ये मियाने पुढे म्हटलं आहे.
-
पतीपासून वेगळं होण्याच्या या घोषणेच्या काही दिवसआधी मियाने पती रॉबर्ड सँडबर्गला इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
-
मिया आणि रॉबर्ट एकमेकांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचे.
-
लग्न मोडत असल्याची घोषणा करणारी एक पोस्टच या दोघांनी आपआपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केलीय.
-
दोघांच्या चालणाऱ्या सावल्या आणि त्यावरील भागामध्ये आपल्या चाहत्यांसाठी या दोघांनी अशाप्रकारे मजकूर लिहून पोस्ट केलाय.
-
‘द सन’च्या एका वृत्तानुसार मियाने पहिल्यांदा २०११ मध्ये लग्न केलं होतं.
-
मियाचं पहिलं लग्न तीन वर्ष टीकलं.
-
२०११ ते २०१४ दरम्यान मियाचं पहिलं लग्न टीकलं.
-
नंतर मियाने घटस्फोट घेतला होता.
-
मात्र तेव्हा मियाचा नवरा कोण होता याबद्दल तिने काहीच खुलासा केला नव्हता.
-
या दोघांचा एकही फोटो जगासमोर आला नाही.
-
नंतर तिने २०१९ मध्ये रॉबर्टसोबत लग्नाची घोषणा केली होती.
-
मिया आणि रॉबर्ट आधी छान मित्र झाले आणि नंतर प्रेमात पडले.
-
रॉबर्ट हा सेलिब्रिटी शेफ आहे.
-
१४ मार्च २०१९ रोजी मियाने रॉबर्टशी लग्न करत असल्याची घोषणा केलेली.
-
हे दोघेही सोशल नेटवर्किंगवर फार सक्रीय आहेत. त्यामुळेच वेगळं होतं असल्याची घोषणा त्यांनी याच प्लॅटफॉर्मवरुन केलीय. (सर्व फोटो मिया आणि रॉबर्टच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल