-
सोशल नेटवर्किंगवर एखादा भन्नाट फोटो पोस्ट करण्यासाठी अनेकजण सेल्फीच्या नादात आपला जीवही धोक्यात टाकतानाचं चित्र दिसत. असाच एक धक्कादायक प्रकार हाँगकाँगमधून समोर आला असून एका लोकप्रिय सोशल मीडिया स्टारचा यामध्ये मृत्यू झालाय.
-
हाँगकाँगमधील सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर आणि मॉडल असणाऱ्या सोफिया चेउंगचा अशाच एका दुर्घटनेत मृत्यू झाला.
-
सोफिया ही एका धबधब्याजवळ सेल्फी काढत असतानाच तिचा तोला गेला आणि ती उंचावरुन खाली पडली.
-
सोफिया ३२ वर्षांची होती.
-
मित्रमंडळींसोबत ट्रेकिंगला गेलेली असतानाच झालेल्या अपघातामध्ये सोफियाचा मृत्यू झाला.
-
सोफिया ही तिच्या मित्रमंडळींसोबत 'हा पाक लाई' पार्क येथे ट्रेकसाठी गेली होती तिथेच हा अपघात झाला.
-
धबधब्याजवळ सेल्फी काढण्याच्या नादात सोफियाचा तोल गेला आणि ती खाली पडून तिचा मृत्यू झाल्याचं द इन्डीपेडंटने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
-
समोर आलेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार सोफिया त्सिंग दाई स्ट्रीम नावाच्या छोट्या धबधब्याजवळ सोफिया पोज देऊन फोटो काढताना घडला.
-
फोटो काढत असतानाच तोल जाऊन सोफिया खाली पडली पण नशीबाने ती खोल दरीत न पडता फोटो काढण्याच्या जागेपासून पाच मीटरवर असणाऱ्या ब्रिजवर पडली.
-
मात्र या अपघातामध्ये सोफियाला गंभीर दुखापत झाली होती. तिला तिच्या मित्रांनी तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला.
-
रुग्णालयामध्ये सोफियाला दाखल केलं असता तिला मृत घोषित करण्यात आलं.
-
सोफिया ही जीव धोक्यात घालून फोटो घेणाऱ्यांपैकी एक होती. तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिल्यावर लगेच हे लक्षात येईल.
-
साधा सेल्फी काढण्यासाठी किंवा इन्स्टाग्राम वर चांगला फोटो पोस्ट करता यावा म्हणून ती अगदी वाटेल त्या ठिकाणी जाऊन फोटो काढायची.
-
सोफियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंट असे बरेच धोकादायक फोटो तुम्हाला पहायला मिळतील.
-
हा सोफियाने पोस्ट केलेल्या शेवटचा फोटो ठरला. हा फोटो तिने ८ जुलै रोजी पोस्ट केला होता.
-
"चांगले दिवस येत आहेत… ज्यांना आपण शनिवार, रविवार म्हणतो," असं सोफियाने आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
-
आता याच फोटोवर सोफियाला तिचे फॉलोअर्स श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
-
इन्स्टाग्रामवर सोफियाचे ३२ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते.
-
सोफियाला हायकिंग आणि कायाकिंगचीही आवड होती.
-
समुद्रकिनाऱ्यावर क्लिक केलेले अनेक फोटो ती सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करायची.
-
फोटोग्राफरकडे पाठ करुन समोरचे दृष्य कॅमेरात कैद होईल किंवा आपण नक्की किती उंचीवर उभे आहोत हे दाखवण्याचा सोफियाचा प्रयत्न असायचा.
-
सोफियाने असे उंच डोंगरकड्यांवर काढलेले अनेक फोटो तिच्या अकाउंटला पहायला मिळतील.
-
अगदी दोरखंडांना धरुन डोंगर चढतानाचेही फोटो सोफियाने पोस्ट केले होते.
-
सोफिया ही सोशल नेटवर्किंगवर भटकंती करणारी इन्फ्यूएन्सर म्हणून लोकप्रिय होती.
-
हायकिंग, कायाकिंग, एक्सप्लोरर, आऊटडोअर अॅक्टीव्हीटी, फोटोग्राफी यामध्ये आपल्याला रस असल्याचं सोफियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरील बायोमध्ये लिहिलं होतं.
-
तसेच सोफियाने आपल्या इन्स्टा अकाउंटमध्ये 'आयुष्य हे मनोरंजक असावे, कंटाळवाणे नाही,' असंही लिहिलं होतं.
-
मागच्या आठवड्यामध्ये मॅक्सिकोमध्येही सोफियाप्रमाणाचे एका २४ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लूएन्स असणाऱ्या तरुणीचा झऱ्याजवळ उंचावरुन पडून मृत्यू झाला होता.
-
मात्र सोफियाप्रमाणे तिचा लगेच शोध लागला नाही. मॅक्सिकोमधील या तरुणीचा मृतदेह शोधून काढण्यासाठी १२ तास लागले होते.
-
सोफियाच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा सोशल नेटवर्किंगवर काही फॉलोअर्स मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालण्यावरुन वाद सुरु झाला आहे.
-
यापूर्वीही अनेकदा अगदी भारतात सुद्धा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात होऊन लोकांचे मृत्यू झाल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळेच सेल्फी काढताना अधिक काळजी घेणं हे फायद्याचं ठरतं हे सोफियासोबत घडलेल्या अपघातामधून पुन्हा एकदा अधोरेखित होतं, असच म्हणता येईल. (सर्व फोटो : instagram/hike.sofi वरुन साभार)
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल