-
अश्लील चित्रपटांची निर्मिती केल्याप्रकरणी आणि मोबाइल अॅपवरुन त्यांचं प्रसारण केल्याच्या गुन्ह्याखाली अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा हे मागील काही आठवड्यांपासून अटकेत आहेत.
-
पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा यांना अटक केलीय.
-
राज कुंद्रा यांच्यासंदर्भातील बरीच धक्कादायक माहिती हळूहळू समोर येत असून. मागील तीन आठवड्यांपासून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
-
असं असतानाच आता राज यांचे काही जुने फोटो समोर आले आहेत. हे फोटो एका मोबाइल फेस चेंज अॅपवरुन चेहरा मॉर्फ करुन तयार करण्यात आलेल्या व्हिडीओंमधील स्क्रीनशॉर्ट्स आहेत.
-
या फोटोंमध्ये कधी राज कुंद्रा बाहुबलीच्या रुपात दिसत आहेत तर कधी कॅप्टन अमेरिका म्हणून दिसत आहेत.
-
कुंद्रा यांनी या अॅपवरुन अर्जून कपूर आणि श्रुति हसनवर चित्रित झालेल्या मॅड मिया गाण्यावर स्वत:चा व्हिडीओवर एडीट करुन तो शेअर केलेला. त्याच व्हिडीओतील हा त्यांचा अर्जून कपूर लूक.
-
केवळ बॉलिवूडच नाही तर कुंद्रा यांनी दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनच्या 'बुटा बम्मा' गाण्यावरील व्हिडीओही एडीट करुन शेअर केलेला. या गाण्यात अल्लू अर्जूनच्या जागी राज कुंद्रा डान्स करताना दिसत होते.
-
अभिनेता रणवीर सिंहच्या बाजीराव मस्तानीमधील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक असणाऱ्या मल्हारी गाण्यावरही कुंद्रा यांनी एडीटींगच्या मदतीने स्वत:चा चेहरा लावून व्हिडीओ पोस्ट केलेला.
-
टायगर श्रॉफच्या सुपरहिरो थीमवर आधारीत 'फ्लाइंग जट' या चित्रपटातील काही दृष्यही कुंद्रा यांनी या अॅपच्या मदतीने एडीट करुन तिथे आपला चेहरा लावून शेअर केलेली.
-
हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट कमी की काय म्हणून कुंद्र यांनी या अॅपवरुन कॅप्टन अमेरिका चित्रपटातील एका छोटी क्लिपही या अॅपवर एडीट करुन व्हिडीओ शेअर केलेला.
-
कॅप्टन अमेरिकाबरोबरच 'आर्यन मॅन' म्हणजेच रॉबर्ट डाउन न्यूनियरवर चित्रित करण्यात आलेला 'अॅव्हेंजर्स' चित्रपटातील एक सीन स्वत:चा चेहरा टाकून एडीट केलेला.
-
आयुषमान खुरानाने अभिनय केलेल्या 'दम लगा के हईशा' या चित्रपटातील एका गाण्यावरही कुंद्रा यांनी आपली कलाकारी दाखवली होती.
-
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या 'गोलियों की रास लीला-राम लीला' चित्रपटातील 'धतड् ततड्…' गाण्याच्या व्हिडीओवरही राज कुंद्रा यांनी व्हिडीओ एडीटींगच्या माध्यमातून स्वत:चा चेहरा लावला होता.
-
अभिनेता ऋतिक रोशनच्या 'धूम -२' या सुपरहीट चित्रपटातील काही अॅक्शन सीन्सही कुंद्रा यांनी या अॅपच्या मदतीने एडीट केले होते.
-
इतकचं नाही तर देशभरामध्ये प्रचंड गाजलेल्या 'बाहुबली' चित्रपटामधील काही सिन्सही कुंद्रा यांनी एडीट करुन पोस्ट केले होते.

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…