-
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
-
मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत मोदींनी ही माहिती दिली आहे. मोदींनी यासंदर्भातील दोन ट्विट केले असून हे नाव बदलण्यामागील कारणाचाही खुलासा त्यांनी केलीय.
-
खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं जावं यासाठी आपल्या देशभरातून लोकांच्या विनंती येत होत्या असं मोदींनी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे. “मला देशभरातील नागरिकांनी अनेकदा खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देण्यात यावा अशी मागणी केली. मी त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल त्याचे आभार मानतो. त्यांच्या भावनांचा आदर करुन यापुढे खेलरत्न पुर्सकारांचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावाने ओळखला जाईल,” असं मोदी पहिल्या ट्विटमध्ये म्हणालेत.
-
या घोषणेनंतर मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देशातील सर्वोच्च खेळ पुरस्कार देण्याबरोबरच आता मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी मागणीही केली जात आहे. त्यामुळे भारतरत्न शब्द ट्रेण्डमध्ये आहे. विशेष म्हणजे बरनॉल शब्दही ट्विटरवर ट्रेण्डमध्ये आहे.
-
पुरस्काराचं नाव बदलल्याने ज्यांचा जळफळाट होत असेल त्यांनी बरनॉल लावावं असा सल्ला भाजपा समर्थकांनी दिलाय.
-
यासंदर्भात ट्विटवर अनेकांनी मिम्स पोस्ट केलेत.
-
अनेकांनी मोदी सरकारने पुस्काराचं नाव बदलण्याचा निर्णय योग्य असल्याचं म्हणत विरोधकांना टोला लगावलाय.
-
मोदींच्या फोटोंसहीत अनेकांनी बरनॉलसंदर्भातील मिम्स पोस्ट केलेत.
-
विरोधकांना आता ट्रकभर बरनॉल लागतील असं काहींनी म्हटलंय.
-
काहींनी मोठ्या ट्रेलरमधून बरनॉल पाठवा असं म्हटलंय.
-
तर काहींनी विरोधकांच्या भावना अशा असतील असं मिम्सच्या माध्यमातून म्हटलं आहे.
-
अनेकांना हे ट्रेण्डिगं काय आहे असा प्रश्न पडलाय.
-
समर्थकांनी मात्र मोदींचं या निर्णयासाठी कौतुक केलंय.
-
सहन करुन अशी मोदी विरोधकांची भूमिका असल्याचं या मिममधून म्हटलंय.

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…