-
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
-
मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत मोदींनी ही माहिती दिली आहे. मोदींनी यासंदर्भातील दोन ट्विट केले.
-
या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी ट्विटवरुन या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
-
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनीही या निर्णयासाठी मोदींचं अभिनंदन केलं आहे.
-
पात्रा यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
-
मात्र पात्रा यांनी पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ध्यानचंद अगदी कोपऱ्यात दिसत आहेत. तर मोदींचा फोटो तुलनेने मोठ्या आकारात दिसत आहे. यावरुनच मोदी आणि पात्रा सोशल नेटवर्किंगवर ट्रोल झाले आहेत.
-
मी त्यांना पाहिलं नाहीय पण फोटोत दिसणारी व्यक्ती ध्यान चंद नाहीत असं एकाने म्हटलंय.
-
फोटोत ध्यानचंद कुठेत?. असं एकाने विचारलंय.
-
एकाने मिम शेअर करत ध्यान चंद या फोटोत मी मागे पडलोय असं म्हटलंय.
-
एकाने ध्यान चंद यांना दाढी आल्याचा टोला लगावला आहे.
-
यात ध्यानचंद कुठेत?, असं एकाने म्हटलंय.
-
एवढा मोठा फोटो लावल्याबद्दल मोदींचे आभार असा उपहासात्मक टोला एकाने लगावलाय.
-
पण या फोटोत ध्यान चंद आहेत कुठे असं एकजण म्हणालाय.
-
ध्यान चंद तेव्हा आणि आता किती वेगळे दिसतात असा टोला एकाने लगावलाय.
-
गोल करताना त्यांची दाढी मध्ये आली नाही असा उपहासात्मक टोला एकाने लगावला आहे.
-
तर एकाने या फोटोतील मेडल हे परमवीर चक्र असल्याचं म्हटलंय.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल