-
एका टॅक्सी चालकाला भररस्त्यात मारहाण करणाऱ्या 'लखनऊ गर्ल'चा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
-
व्हिडीओमधल्या या लखनऊ गर्लने टॅक्सी चालकाला एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २० वेळा लागोपाठ कानाखाली लगावलीय. लखनऊ गर्लचा हा हायव्होल्टेज ड्रामा बराच चर्चेत आलाय.
-
रस्त्यावर टॅक्सी ड्रायव्हरला २२ वेळा कानाखाली लगावणारी 'ती' तरुणी नेमकी आहे तरी कोण? तुम्हाला माहितेय का?
-
या व्हिडीओमधल्या 'लखनऊ गर्ल'चं नाव प्रियदर्शनी नारायण यादव असं आहे.
-
प्रियदर्शनीने बीएससी, एमएससी आणि एम.फिलमध्ये डिग्री मिळवली असून सोबत रिसर्चचा देखील तिने अनुभव घेतलाय.
-
प्रियदर्शनीने दिल्लीसारख्या शहरात काम केलंय. पण सध्या ती लखनऊमध्ये रहायला असते.
-
प्रियदर्शनीने सुरूवातीला लखनऊ विश्वविद्यालयात लेक्चरर म्हणून काम केलंय.
-
प्रियदर्शनी यादव तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
-
तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नजर टाकली की लक्षात येतं की तिला फोटो क्लिक करण्याची बरीच आवड आहे.
-
तिच्या आईचं नाव शशिकला प्रसाद असून त्या समाजवादी पक्षाच्या सदस्या आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
-
तिचे वडील रेल्वे कर्मचारी होते. नुकतंच ते सेवेतून निवृत्त झाले आहेत.
-
प्रियदर्शनी पार्ट टाइम मॉडेम म्हणून काम करते. सोबतच ती विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत असून 'पम्पकिन क्लासेस' असं तिच्या क्सासेसचं नाव आहे.
-
तसंच ती 'माय हल्क फॅशन कलेक्शन'ची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर सुद्धा आहे.
-
लोकांनी तरुणीच्या अरेरावीवर रोष व्यक्त करत तिच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
-
तर दुसरीकडे कॅब ड्रायव्हरला पाठिंबा देण्यासाठी #justiceforcabdriver हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतोय. (Photo: Instagram/priyadarshini.n.yadav)
‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…