-
दरवर्षी १३ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय लेफ्ट हँडर्स डे म्हणून साजरा केला जातो. उजव्या हाताने लिहिणाऱ्यांच्या जगामध्ये डाव्या हाताने लिहिणाऱ्यांसाठी हा दिवस साजरा केला जातो. डावखुऱ्या व्यक्तांनी या उजव्या हाताने लिहिणाऱ्यांच्या जगात दैनंदिन आयुष्यात कोणत्या अडचणींचा समाना करावा लागतो हे जाणवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी डावखुरेपणा साजरा केला जातो असं गंमतीने म्हटलं आहे.
-
१९७६ साली सर्वात आदी लेफ्ट हॅण्डर्स इंटरनॅशन आयएनसीचे संस्थापक डॅन आर कॅम्पाबेल यांनी पहिल्यांदा लेफ्ट हॅण्ड दे साजरा केला होता. त्यानंतर दरवर्षी १३ ऑगस्टला हा दिवस साजरा केला जातो.
-
एका अभ्यासानुसार जगातील १० टक्के लोकसंख्या ही डावखुरी आहे. म्हणजेच जगातील ९० टक्के लोक उजव्या हाताने लिहिताता. त्यातही डावखुऱ्या व्यक्तींमध्ये पुरुषांचे प्रमाण हे महिलांपेक्षा अधिक आहे.
-
या डावखुऱ्यांमध्ये काही प्रसिद्ध व्यक्तींचाही समावेश आहे. आजच्या डावखुऱ्या दिनानिमित्त पाहूयात प्रसिद्ध डावखुऱ्या व्यक्तींची यादी… (यादी इंडियन लेफ्ट हॅण्डर्स क्लबच्या माहितीनुसार)
-
महात्मा गांधी हे डावखुरे होते.
-
मदर तेरेसा डाव्या हाताने लिहायच्या.
-
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डाव्या हाताने लिहितात.
-
अमिताभ बच्चन डावखुरे आहेत.
-
रजनीकांत डाव्या हाताने लिहितात.
-
सचिन तेंडुलकर डावखुरा आहे.
-
उद्योजक रतन टाटा हे सुद्धा डावखुरे आहेत.
-
दिग्दर्शक करण जोहर डावखुरा आहे.
-
विनोदी अभिनेता कपील शर्माही डावखुराच आहे.
-
अभिनेता अभय देओलही डावखुरा आहे.
-
प्रसिद्ध गायिका आशा भोसलेही डावखुऱ्या आहेत.
-
अभिनेत्री आयिशा टाकीयाही डाव्या हाताने लिहिते.
-
बॉक्सिंगपटू मेरी कोम डाव्या हाताने लिहिते.
-
प्रसिद्ध उद्योजक लक्ष्मी मित्तही डावखुरेच आहेत.
-
वडिलांप्रमाणे अभिनेता अभिषेक बच्चनही डावखुराच आहे.
-
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा डावखुरी आहे.
-
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री डावखुरे आहेत.
-
जागतिक स्तरावरील प्रसिद्ध डावखुऱ्या व्यक्तींबद्दल बोलायचं झाल्यास गतिशास्त्रावरील निष्कर्ष आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारे आयझॅक न्यूटन डावखुरे होते.
-
प्रसिद्ध फ्रेंच योद्धा नेपोलियन बोनापार्ट डावखुराच होता.
-
चित्रकार पाबलो पिकासो डावखुरा होता.
-
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाही डाव्या हाताने लिहितात.
-
मुलाखतकार ओपरा विन्फ्रेसुद्धा डावखुऱ्या आहेत.
-
डिन्सेचे संस्थापन वॉल्ट डिस्नेही डावखुरेच होते.
-
अभिनेता टॉम क्रुझ डावखुरा आहे.
-
क्रिकेटपटू अॅलेन बॉर्डर डावखुरे आहेत.
-
अल्बर्ट आइनस्टाइन डावखुरे होते.
-
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गही डावखुराच आहे.
-
अभिनेत्री अँजेलिना ज्युली सुद्धा डावखरीच आहे.
-
गायक मायकल जॅक्सनही डावखुराच होता.
-
विनोदाचे बादशाह चार्ली चॅम्पलीन डावखुरेच होते.
-
आजही रोजच्या दैनंदिन जिवनामधील लहान लहान गोष्टीही उजव्या हाताच्या व्यक्तींचा विचार करुनच बनवल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने कात्री, कीबोर्ड, डेस्क, गीटर अगदी व्हिडीओ कन्सोलरही उजव्या हाताच्या व्यक्तींना वापरण्यास योग्य ठरतील या दृष्टीकोनातून बनवले जातात. (सर्व फोटो : पिक्साबे, रॉयटर्स, एपी, एएनआयवरुन साभार)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल