-
आज भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची तिसरी पुण्यतिथी आहे.
-
२०१८ मध्ये १६ ऑगस्ट या दिवशी त्यांचे निधन झाले होते.
-
२५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वाल्हीर येथे जन्मलेले, अटल बिहारी वाजपेयी यांचे भारताच्या विकासासाठी योगदान नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहिल.
-
त्यांना चार दशकांचा दीर्घ संसदीय अनुभव होता आणि पंतप्रधान म्हणून त्यांचा वारसा समृद्ध आहे जो आजही स्मरणात राहतो.
-
२०१५ साली त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
-
जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तीन वेळा पंतप्रधानपद भूषवलेले अटलबिहारी वाजपेयी हे एकमेव नेते होते.
-
त्यांना केवळ राजकारणात रस न्हवता तर कवितेतही रस होता.
-
१९९९ मध्ये त्यांनी ज्येष्ठ गझल गायक जगजीत सिंग यांच्यासोबत 'नई दिशा' नावाचा अल्बम रिलीज केला. त्यात वाजपेयींनी त्यांच्या कविता कथन केल्या आणि सिंग यांनी त्या गायल्या होत्या.
-
उत्कृष्ट वक्ते असलेल्या वाजपेयींनी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून खूप प्रसिद्धी मिळवली होती. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हिंदीमध्ये भाषण दिले होते.
-
अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देऊन जाणार आहे (सर्व फोटो इंडियन एक्सप्रेस)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार