-
आसाममधील आयपीएस अधिकाऱ्या असणारा संजुक्ता पराशर यांचा उल्लेख करताना त्यांच्या नावाच्या आधी हिंमत, वीरता आणि साहस या शब्दाचे सर्व समानार्थी शब्द वापरले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.
-
संजुक्ता या सुरक्षा दलाच्या स्टार ऑफिसर असल्या तरी दहशतवाद्यांसाठी त्या कर्दनकाळ आहेत.
-
संजुक्ता या आसामच्या दुर्गम जंगलांमध्ये एके-४७ बंदूक घेऊन आपल्या टीमसोबत गस्त घालत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ओळखल्या जातात.
-
आसाममध्ये सध्या संजुक्ता यांच्या नावाने दहशतवाद्यांचा थरकाप उडतो असं चित्र आहे.
-
'द बेटर इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार संजुक्ता यांचा जन्म आसाममधलाच आहे. त्यांनी आसाममधूनच आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं.
-
त्यानंतर संजुक्ता यांनी दिल्लीमधील इंद्रप्रस्थ कॉलेजमधून राज्यशास्त्र या विषयामध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं.
-
नंतर संजुक्ता यांनी जवाहरलाल नेहरु विद्यापिठामधून आंतरराष्ट्रीय संबंध या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.
-
संजुक्ता यांनी पदव्युत्तर शिक्षणानंतर अमेरिकन परराष्ट्र निती या विषयामध्ये एमफील आणि पीएचडीचा अभ्यास केला.
-
संजुक्ता यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या युपीएससीच्या परीक्षेमध्ये देशातून ८५ वा क्रमांक मिळवला.
संजुक्ता या २००६ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. -
ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संजुक्ता यांनी आपली पहिली निवड म्हणून मेघालय आणि आसाम कॅडरची निवड केली आणि सेवेत रुजू झाल्या.
-
२००८ साली संजुक्ता यांना त्यांची पहिली पोस्टींग आसाममधील माकूम येथे सहाय्यक कमांडर म्हणून मिळाली.
-
त्यानंतर संजुक्ता यांना बोडो आणि बंगलादेशमधील उदालगीरांमध्ये सुरु असणाऱ्या संघर्ष रोखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या तुकडीसोबत पाठवण्यात आलं.
-
संजुक्ता यांना दहशतवादी संघटनांकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत. मात्र त्यांनी त्या कधी फारश्या गांभीर्याने घेतल्या नाहीत.
-
सध्या संजुक्ता हे नाव दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याने दहशतवादी त्यांना थोडे घाबरुनच असतात.
-
२०१५ मध्ये संजुक्ता यांनी बोडो दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेचं नेतृत्व केलं होतं.
-
तुमचा विश्वास बसणार नाही पण संजुक्ता यांनी आतापर्यंत १६ दहशतवाद्यांना ठार केलं आहे.
-
संजुक्ता यांनी १६ दहशतवाद्यांना ठार करण्याबरोबरच शेकडो टन स्फोटकेही त्यांनी पकडून दिली आहेत आणि हे सारं त्यांनी केवळ १५ महिन्यांमध्ये केलंय.
संजुक्ता यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टीमने २०१४ मध्ये १७५ तर २०१३ मध्ये १७२ दहशतवाद्यांना अटक केलीय. -
एक उत्तम पोलीस अधिकारी असण्याबरोबरच जेव्हा जेव्हा संजुक्ता यांना मोकळा वेळ मिळतो त्या मदत छावण्यांमध्ये जाऊन गरजूंना मदत करतात.
-
संजुक्ता हा एखाद्या लोकल सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत.
-
मात्र त्याचवेळी स्थानिकांमध्ये संजुक्ता यांच्याबद्दल आदरयुक्त भीतीही आहे.
-
संजुक्ता या सोशल नेटवर्किंगवरुन वेगवेगळे फोटो शेअर करत असतात.
-
अनेक ठिकाणी संजुक्ता या तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात.
-
संजुक्ता या आसाममधील सोनितपूरच्या पोलीस अधीक्षक असताना त्यांनी एका मोहिमेमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका तुकडीचं नेतृत्व केलं होतं.
-
या लढाईमध्ये संजुक्ता यांनी एके-४७ च्या मदतीने बोडो दहशतवाद्यांना चोख उत्तर दिलं होतं. सध्या सोशल मीडियावर हेच फोटो व्हायरल होत आहेत.
-
या व्हायरल फोटोंमध्ये संजुक्ता एके-४७ रायफल घेऊन त्यांच्या तुकडीसोबत चालताना दिसत आहेत. त्यांचा हा अवतार आणि रोखठोक निर्णय पाहून दहशतवाद्यांची भीतीने गाळण उडते.
-
संजुक्ता या ४१ वर्षांच्या असूनही अगदी फीट आहेत. त्या रोज मॉर्निंग वॉकला वगैरे तर जातातच शिवाय आपल्या सहकऱ्यांनाही त्या ठणठणीत राहण्याचं महत्व पटवून देतात.
-
वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांसाठी आयोजित मॅरेथॉनमध्येही संजुक्ता यांनी यापूर्वी सहभाग घेतलाय.
-
त्या प्रचंड लोकप्रिय आहेत तरी त्या स्वत:बद्दल बोलताना "मी फार प्रेमळ आणि नम्र आहे केवळ आरोपींनीच मला घाबरलं पाहिजे," असं चेहऱ्यावर स्मिथहास्य ठेवत सांगतात.
-
संजुक्ता या खरोखरच कर्तृत्वाने स्वत:च्या हिंमतीवर समाजामध्ये ओळख निर्माण करणाऱ्या महिला अधिकारी म्हणून आदर्श घेण्यासारख्याच आहेत. (सर्व फोटो फेसबुकवरुन साभार)

Devendra Fadnavis: सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाची दांडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार