-
टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्ण कामगिरीसाठी भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रांनी एक्सयूव्ही ७०० ही गाडी देणार असल्याची घोषणा सात ऑगस्ट रोजी ट्विटरवरुन केली.
-
आनंद महिंद्रानी नीरजचं अभिनंदन केल्यानंतर त्याला तुम्ही एक्सयूव्ही ७०० देणार का असं एकाने विचारलं होतं.
-
त्यावर उत्तर देताना आनंद महिंद्रांनी, "हो नक्कीच हे माझं भाग्य असेल की मी आपल्या गोल्डन अॅथलीटला आमची नवी गाडी देऊ शकेन," असं म्हणत आपल्या सहकाऱ्यांना नीरजसाठी एक गाडी तयार ठेवण्याची विनंती केली होती.
-
तशी पदक जिंकल्यानंतर नीरजला अनेक बक्षिसं मिळाली.
-
मात्र आनंद महिंद्रानी नीरजसाठी जाहीर केलेल्या या बक्षिसाची तुफान चर्चा सोशल मीडियावर रंगली.
-
तसेच या गाडीचीबद्दलही अनेकांची उत्सुकता वाढली.
-
या घोषणेनंतर बरोबर एका आठवड्याने महिंद्रा अॅण्ड महिंद्राने आपली ही बहुप्रतिक्षित गाडी बाजारात आणलीय. पण आनंद महिंद्रा नीरजला भेट देणारी ही गाडी आहे तरी कशी याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. जाणून घेऊयात याच गाडीचे फिचर्स, काही स्मार्ट फिचर्स आणि किंमत याबद्दल…
-
महिंद्रा अॅण्ड महिंद्राने एक्सयूव्ही ७०० या बहुप्रतिक्षित आलिशान गाडी शनिवारी (१४ ऑगस्ट २०२१ रोजी) पहिल्यांदा चाहत्यांसमोर आणली.
-
बऱ्याच कालावधीपासून महिंद्राच्या या गाडीची चर्चा होती आणि आता ही गाडी समोर आल्यानंतर खरोखरच ती खास असल्याचं दिसून येत आहे.
-
लॉन्च प्रीव्ह्यूमध्ये एक्सयूव्ही ७०० चे फिचर्स आणि किंमती समोर आल्या आहेत.
-
एक्सयूव्ही ७०० चा पाच सीटर पर्याय निळ्या आणि स्लेट ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
-
महिंद्रा अॅण्ड महिंद्राने शनिवारी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता तामिळनाडूमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये या गाडीची अधिकृत घोषणा केली. जाणून घेऊयात नक्की या गाडीत काय आहे खास…
-
एक्सयूव्ही ७०० ही ह्युंदाईची अल्केझार, टाटा सफारी आणि एमजी हेक्टर प्लसला टक्कर देणार आहे.
-
आधीच या तीन गाड्या सध्या मीड रेंजमध्ये प्रचंड लोकप्रिय असतानाच महिंद्राच्या या नव्या गाडीला बाजरपेठ काबीज करताना मोठं आव्हान मिळणार आहे.
-
एक्सयूव्ही ७०० मध्ये डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही इंजिनचा पर्याय उपलब्ध आहे.
-
एक्सयूव्ही ७०० चं पेट्रोल व्हर्जन २०० बीचपी, २.० एल टर्बो मोटरसहीत आहे.
-
तर एक्सयूव्ही ७०० चं डिझेल व्हर्जन १८५ बीएचपी, २.२ एल, एमहॉक टर्बो युनिटसहीत आहे.
-
पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनसोबत सिक्स स्पीड मॅन्यूअल गेअरबॉक्स सहीत सिक्स स्पीड टॉर्क कनव्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आलाय.
-
ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे ही गाडी हातळण्यास अधिक सोपी आणि खास ठरते असं जाणकार सांगतात.
-
एक्सयूव्ही ७०० मध्ये एम्बियंट लायटींग, ड्युएल झोन ऑटोमॅटिक एसी, पावर्ड फ्रण्ट सीटसारखे पर्याय देण्यात आलेत.
-
तसेच मल्टी फक्शनल स्टेअरिंग व्हीलही फारच आकर्षक आहे.
-
गाडीच्या डिझाइनवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे.
-
गाडीतील बारीकसारीक गोष्टींची डिटेलींग ही या रेंजमधील कोणत्याही परदेशी कंपनीच्या गाड्यांना तोडीस तोड आहे.
-
मल्टी फक्शनल स्टेअरिंग व्हीलही फारच आकर्षक आहे.
-
सोनी थ्री डी साउंड सिस्टीम, १२ स्पीकर्स, पुश-बटण स्टार्ट आणि स्टॉप, कॅबिन एअर फिल्टरसारख्या सुविधाही एक्सयूव्ही ७०० मध्ये आहेत.
तसेच कॅबिन एअर फिल्टर, क्रूझ कंट्रोल आणि पॅनरॉमिक सनरुफसारखे फिचर्सही एक्सयूव्ही ७०० मध्ये देण्यात आलेत. -
एक्सयूव्ही ७०० मध्ये ऑटो बुस्टर हेडलॅम्प आहे. हा हेडलॅम्प रात्री गाडी चालवताना फार फायद्याचा ठरणार असून तो साध्या हेडलाइटपेक्षा अधिक सुरक्षित असल्याचं सांगितलं जातं.
-
गाडीमध्ये इंटीग्रेटेड ड्युएल एचडी सुपरस्क्रीन देण्यात आलेली आहे.
-
बिल्डइन अॅलेक्स इंटीग्रेशन देण्यात आल्याने अनेक कामं केवळ व्हॉइस कमांडने करता येतील.
-
चालक थकला असेल तर ते सुद्धा या स्मार्ट गाडीला कळणारी यंत्रणात गाडीत आहेत. त्यासंदर्भातही अलर्ट देणारी यंत्रणा गाडीमध्ये आहे.
-
गाडीमध्ये झीप, झॅप, झूम आणि कस्टम असे चार ड्राइव्ह मोड गाडीमध्ये देण्यात आलेत.
-
गाडीचे फंक्शन्स मोबाइल अॅपवरुनही कंट्रोल करता येतील. गाडीसंदर्भातील माहिती या अॅपमध्ये मिळेल.
अॅडप्टीव्ह क्रूज कंट्रोलमध्ये गाडीच्या आजूबाजूला असणाऱ्या गाड्यांच्या वेगानुसार वेग किती असावा याच्या सूचना आणि सल्ले चालकाला देण्याची सुविधा देण्यात आलीय. हाय बीम असिस्टमध्ये समोरुन येणाऱ्या गाड्यांना त्रास होऊ नये म्हणून गाडीचे हेडलाइट आपोआप लो बीम आणि हाय बीमवर गरजेप्रमाणे बदलत राहतील. -
ट्रॅफिक सिग्नल रेक्गनेशन म्हणजेच रस्त्यांच्या बाजूला असणारे फलकही गाडीमधील यंत्रणा आपोआप वाचेल आणि त्यानुसार सूचना देत राहील.
-
सेव्हन सीटर पर्यायामध्ये एक दोन नाही तब्बल सात एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही गाडी फार सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा आहे.
-
ईएसपी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी प्रोग्राम या पर्यायच्या माध्यमातून गाडी कठीण वळणांवरही स्थीर राहील याकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे.
फ्रण्ट कोलिजन वॉर्निंग या यंत्रणेअंतर्गत गाडीसमोर एखादी वस्तू आली तर चालकाला लगेच अलर्ट करण्यात येईल. -
डायमंड कट अॅलॉय कट पद्धतीचे टायर्स गाडीला आहेत.
थ्री डी नकाशे, लाइव्ह ट्रॅफिक अपडेट्स यासारखे पर्याय चालकाच्या सोयीसाठी देण्यात आलेत. -
बीव्हायओडी म्हणजेच ब्रिंग युआर ओन डिव्हाइज या पर्यायामुळे मोबाइल सिंक्रोनाइज केल्यानंतर त्यावरील स्क्रीन थेट गाडीच्या एचडी स्क्रीनशी कनेक्ट होऊन स्क्रीन तिथे शेअर केली जाईल.
-
गाडीच्या फ्युएल टँकची क्षमता ६० लीटर इतकी आहे.
-
गाडीची किंमत किती असेल याबद्दल चाहत्यांमध्ये फार चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं होतं. जाणून घेऊयात या गाडीच्या वेगवेगळ्या व्हेरिएटंची किंमती किती आहे त्याबद्दल…
-
एक्सयूव्ही ७०० एमएक्स पेट्रोल – ११ लाख ९९ हजार रुपये
एक्सयूव्ही ७०० एमएक्स डिझेल – १२ लाख ४९ हजार रुपये एक्सयूव्ही ७०० एमएक्स थ्री पेट्रोल – १३ लाख ९९ हजार रुपये -
एक्सयूव्ही ७०० एमएक्स पाइव्ह पेट्रोल – १४ लाख ९९ हजार रुपये
-
गाडी फाइव्ह आणि सेव्हन सीटर पर्यायात उपलब्ध असली तरी सध्या फाइव्ह सीटर गाड्यांची किंमत जाहीर करण्यात आली असून सेव्हन सीटरची किंमत आणि फिचर्स लवकरच जाहीर केले जातील.
-
एवढे फिचर्स आणि इतकी आकर्षक गाडी असतानाही नीरजसाठी एक खास गाडी बनवण्यासंदर्भात काम सुरु असल्याचं महिंद्रा ग्रुपच्या डिझायनिंग विभागाच्या प्रमुखांनी ट्विटरवरुन पोस्ट केलेलं.
-
त्यामुळे आता नीरजला देण्यात येणाऱ्या गाडीत या सुविधां व्यतिरिक्त काय खास असेल हे ती गाडी समोर आल्यानंतरच समजेल. (सर्व फोटो साभार ट्विटर आणि महिंद्रा वेबसाईटवरुन साभार)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख